कोळ्याचं जाळं अन् दव बिंदूने कोल्हापूरच्या प्रज्वल चौगुलेला दिली आंतरराष्ट्रीय ओळख, पाहा नेमकं काय झालं?

| Updated on: Apr 14, 2022 | 6:00 PM

अ‍ॅपलच्या वतीने ‘शॉट ऑन आयफोन’ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात मोबाईल फोनवरून फोटो क्लिक करून अॅपल कंपनीला पाठवायचे होते. या मॅक्रो फोटोग्राफी चॅलेंज स्पर्धेत जगभरातील 10 लोकांचा सन्मान करण्यात आला आहे. यात कोल्हापूरच्या प्रज्वल चौगुले याचा समावेश आहे.

कोळ्याचं जाळं अन् दव बिंदूने कोल्हापूरच्या प्रज्वल चौगुलेला दिली आंतरराष्ट्रीय ओळख, पाहा नेमकं काय झालं?
कोल्हापूरचे सुपुत्र प्रज्वल चौगुले यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान
Follow us on

मुंबई : कोल्हापूरकरांना अभिमान वाटावा, अशी बातमी… कोल्हापूरचे (Kolhapur) सुपुत्र प्रज्वल चौगुले (Prajawal Chaugule) यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्यात आला आहे. कोळ्याचं जाळं अन् दव बिंदूंनी कोल्हापूरच्या प्रज्वल चौगुले यांना आंतरराष्ट्रीय ओळख दिली आहे. अॅपल या मोबाईल कंपनीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. अ‍ॅपलच्या वतीने ‘शॉट ऑन आयफोन’ (Shot on iPhone) या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात जगभरातील 10 लोकांचा सन्मान करण्यात आला आहे. यात कोल्हापूरच्या प्रज्वल चौगुले याचा समावेश आहे.

कोल्हापूरच्या सुपुत्राचा आंतरराष्ट्रीय सन्मान

अ‍ॅपलच्या वतीने ‘शॉट ऑन आयफोन’ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात मोबाईल फोनवरून फोटो क्लिक करून अॅपल कंपनीला पाठवायचे होते. या मॅक्रो फोटोग्राफी चॅलेंज स्पर्धेत जगभरातील 10 लोकांचा सन्मान करण्यात आला आहे. यात कोल्हापूरच्या प्रज्वल चौगुले याचा समावेश आहे. यात जगभरातील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. चीन, हंगेरी, इटली, स्पेन, थायलंड आणि अमेरिका यांच्यासह इतर देशांतील दहा जणांची निवड करत अॅपलच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यात प्रज्वल चौगुलेंच्या नावाचाही समावेश आहे.

कोळ्याच्या जाळ्यावर पडलेलं दवबिंदू प्रज्वल यांनी टिपलं आणि त्याने त्यांना जागतिक स्तरावर सन्मान मिळवून दिला. त्यांनी आयफोन 13 प्रोमध्ये हा फोटो काढला आहे.या छायाचित्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. निसर्गाचं अप्रतिम रुप या फोटोत दिसून आलं.

ही स्पर्धा जिंकल्यानंतर प्रज्वल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मी एक निसर्ग प्रेमी आहे आणि मला माझ्या आयफोन 13 प्रोसह पहाटे निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जायला आवडतं. ‘गोल्डन अवर’ हा निसर्गातील सर्वोत्कृष्ट गोष्टी समोर आणतो आणि छायाचित्रकारांना आनंद देतो.कोळ्याच्या जाळ्यावरील दव थेंबांनी माझे लक्ष वेधून घेतले आणि कोरड्या कोळ्याच्या रेशीमने हार कसा तयार केला, ज्यावर दव मोत्यासारखे चमकत होते ते पाहून मी मोहित झालो. हे निसर्गाच्या कॅनव्हासवरील कलाकृतीसारखे वाटले. म्हणून मी ते टिपलं आणि त्याने भारताला जागतिक स्तरावर ओळख दिली. याचं समाधान आहे” असं प्रज्वल चौगुलेने सांगितलं.

संबंधित बातम्या

Video : डॉल्फिनचा ट्रेनरवर हल्ला, काळजाचा थरकाप उडवणारा व्हीडिओ

Video : भारतीय गाण्यावर न्यूयॉर्कमधल्या टाईम्स स्क्वेअरसमोर ठुमके, लाखो लाईक्स- करोडो व्ह्यूज, व्हीडिओ पाहून तुम्हीही फिदा व्हाल!

Video : रानू मंडलने गायलं कच्चा बदाम गाणं, नवरीच्या लुकमधला व्हीडिओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?