दृष्टी गेली पण मेहनत सोडली नाही, पर्याय शोधला अन् कामाले लागले, Video पाहाच!

| Updated on: Oct 10, 2021 | 1:18 PM

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मनोरंजनाचे असताता तर काही व्हिडीओ समाजाचा अरसा दाखवणारे असतात. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक दृष्टिहीन वृद्ध व्यक्ती केळीच्या चिप्स बनवताना दिसत आहे.

दृष्टी गेली पण मेहनत सोडली नाही, पर्याय शोधला अन् कामाले लागले, Video पाहाच!
old man
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मनोरंजनाचे असताता तर काही व्हिडीओ समाजाचा अरसा दाखवणारे असतात. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक दृष्टिहीन वृद्ध व्यक्ती केळीच्या चिप्स बनवताना दिसत आहे.

या दृष्टिहीन वृद्ध व्यक्तीने आपली दृष्टि गमावली आहे. पण हार न मानता हा वृद्ध मेहनत करुन आपले पोटभरताना दिसत आहे. या वृद्धाच्या मेहनतीकडे पाहून सोशल मीडियावरील अनेक यूजर्स या वृद्धाचे कौतुक करत आहेत. नाशिकच्या मखमलाबाद रोडच्या एका बाजूला ह्या वृद्धाचा केळीच्या चिप्सचा स्टॉल आहे. भट्टीच्या उष्णतेमुळे आणि वाफेमुळे त्याची दृष्टी गेली आहे. पण हार न मानता हा वृद्ध आयुष्याची लढाई लढण्यासाठी पुन्हा उभा राहीला आहे.

इथे पाहा व्हिडीओ

नक्की काय आहे या व्हिडीओमध्ये

या व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की त्याचा प्रकाश कमी झाल्यानंतर तो वृद्ध आपल्या मेहनतीने केळीच्या चिप्स कापून गरम तेलात टाकत आहे. यानंतर त्यांनी चिप्स एका मोठ्या कंटेनरमध्ये ठेवल्या. शेवटी हे पाहिले जाऊ शकते की एक दुसऱ्याव्यक्तीच्या मदतीने दुकानात काम करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद

व्हायरल होणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर यूजर संस्कार खेमानी यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 12 मिलीयनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना, पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘या वृद्धाला सलाम. जर तुम्ही नाशिकमध्ये कोणाला ओळखत असाल तर त्यांना या वृद्धाकडून केळीच्या चिप्स खरेदी करायला सांगा. आपण मिळून या वृद्ध व्यक्तीची दृष्टी परत आणण्यास मदत करू शकतो. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक व्हिडिओवर खूप प्रतिक्रिया देत आहेत, एका युजरने कमेंट केले आहे की ‘या वृद्ध माणसाचा खूप आदर वाटतो. ‘

इतर बातम्या :

नाक डोळ्याचं सोडा अहो केसही सेम टू सेम, ही टिकटॉक स्टार हुबेहूब प्रिंसेस डायनाची दुसरी कॉपी!

Smriti Irani | आरशासमोर उभं राहून स्मृती इराणींचा फोटो, पोस्ट शेअर करत म्हणाल्या, ‘माझा विरोधक बघा’

पतीने दिले गुलाबाचे फूल, पत्नी लाजत म्हणाली – ‘प्यार का नशा चढ़ा हुआ है’, पाहा भन्नाट व्हायरल व्हिडीओ