VIDEO : बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, पुढे काय झाले हे पाहा ‘या’ थरारक व्हिडीओमध्ये!

VIDEO : बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, पुढे काय झाले हे पाहा 'या' थरारक व्हिडीओमध्ये!
व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडिया हे एक असे प्लॅटफॉर्म आहे. जिथे आपल्याला दररोज अनेक मजेदार आणि आश्चर्यकारक व्हिडीओ बघायला मिळतात. त्यामध्येही खास करून सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. कधी-कधी हे प्राण्यांचे व्हिडिओ आश्चर्यचकित करतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 25, 2021 | 10:57 AM

मुंबई : सोशल मीडिया (Social media) हे एक असे प्लॅटफॉर्म आहे. जिथे आपल्याला दररोज अनेक मजेदार आणि आश्चर्यकारक व्हिडीओ बघायला मिळतात. त्यामध्येही खास करून सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. कधी-कधी हे प्राण्यांचे व्हिडिओ आश्चर्यचकित करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक प्राण्यांचा व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घातल आहे.

बिबट्या आणि कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये बिबट्या आणि कुत्रे आहे. बिबट्या घराच्या गेटवर चढतो आणि तिथे असलेल्या कुत्र्यावर हल्ला करतो. आता हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. IFS अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.  सीसीटीव्ही फुटेज असलेल्या या क्लिपची सुरुवात घराच्या समोरच्या गेटपासून होते.

कुत्रा गेटसमोर उभे राहून जोरात भूंकताना दिसत आहे. मात्र, काही सेकंदातच कुत्रा तेथून पळून जातो. काही मिनिटांनंतर एक बिबट्या गेटवरून अंगणात उडी मारतो आणि कुत्र्याच्या मागे लागतो. बिबट्या कुत्र्याला आपली शिकार बनवतो आणि गेटवर उडी मारतो आणि त्याला ओढत नेतो. व्हिडिओ शेअर करताना पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, त्या बिबट्याकडे पाहा. इतरांना संधी मिळत नाही.

हा व्हिडिओ 16,000 हून अधिक लोकांनी बघितला आहे. या व्हिडीओवर खूप प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओ पाहून काहीजण आश्चर्यचकित झाले, तर काहींना कुत्र्याबद्दल वाईट वाटले. ज्या घरात बिबट्या पोहोचू शकतो अशा घराबाहेर कुत्रे ठेवणे किती असंवेदनशील आहे हेही अनेकांनी लिहिले. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका यूजरने कमेंट करत लिहिले की, हा व्हिडिओ खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे.

संबंधित बातम्या : 

Video | …जेव्हा हत्ती सोंडेनं त्याला म्हणाला, ‘Thanks यार! तुझ्यामुळे रस्ता क्रॉस करु शकलो’

‘तुस्सी जा रहे हो… तुस्सी ना जाओ’ Harbhajan Singhच्या निवृत्तीनंतर चाहते भावूक, Social Mediaवर ढसाढसा रडले!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें