AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cutest pushpa raj video : ‘या’ चिमुकल्यालाही चढलाय ‘पुष्पा’चा Fever, Dance steps पाहून पडाल प्रेमात

Kid cute video : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' (Pushpa) या चित्रपटाने सर्वांनाच भुरळ घातली. यातील गाणीही सुपरहीट झाली. त्यातीलच एक गाणे म्हणजे श्रीवल्ली (Srivalli)... एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल (Viral) होत आहे, एक चिमुकला यावर डान्स करतोय.

Cutest pushpa raj video : 'या' चिमुकल्यालाही चढलाय 'पुष्पा'चा Fever, Dance steps पाहून पडाल प्रेमात
श्रीवल्ली गाण्यावर डान्स करताना चिमुकलाImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 03, 2022 | 2:22 PM
Share

Kid cute video : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ (Pushpa) या चित्रपटाने असा धमाका केला आहे, की तो आता लोकांच्या मनातून सहजासहजी बाहेर पडत नाही. चित्रपटच नाही तर यातील गाणीही सुपरहीट झाली. त्यातीलच एक गाणे म्हणजे श्रीवल्ली (Srivalli)… हे गाणे लोकांना खूप आवडले. इन्स्टाग्रामवर लोक या गाण्यावर जोरदार रील बनवत आहेत. काहीजण हे गाणे गाताना दिसत आहेत तर काहीजण त्यावर डान्स करताना दिसत आहेत. असाच एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल (Viral) होत आहे, पण खास गोष्ट म्हणजे यावेळी एक लहान मुलगा श्रीवल्ली गाण्याच्या डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. एका लहान मुलाच्या या अप्रतिम व्हिडिओने लोकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की पुष्पा चित्रपटातील प्रसिद्ध श्रीवल्ली गाणे टीव्हीवर सुरू आहे आणि एक लहान मूल ते लक्षपूर्वक पाहत आहे. मग थोड्या वेळाने, तो थोडा पुढे जातो आणि जवळून टीव्ही पाहू लागतो.

एवढ्या लहान मुलाला इतके कसे समजले?

सुरुवातीला मुलाकडे पाहून असे वाटते, की तो फक्त टीव्ही पाहत आहे, परंतु थोड्याच वेळात तो या गाण्याची डान्स स्टेप करू लागतो आणि सर्वांना आश्चर्यचकित करतो. तुम्ही या गाण्यावर अनेक मोठ्यांना नाचताना पाहिले असेल, पण एवढ्या लहान मुलाला अशी डान्स स्टेप करताना तुम्ही क्वचितच पाहिले असेल. हा व्हिडिओ पाहून जितका आनंद होतो तितकेच आश्चर्यही वाटते, की टीव्ही पाहिल्यावर एवढ्या लहान मुलाला इतके कसे समजले?

इन्स्टाग्रामवर शेअर

हा अप्रतिम व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर giedde नावाने शेअर करण्यात आला आहे आणि व्हिडिओमध्ये लिहिले आहे, की Cutest pushparaj… हा व्हिडिओ आतापर्यंत 36 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 6 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर विविध कमेंट्सदेखील केल्या आहेत आणि मुलाच्या डान्स स्टेपचे कौतुक केले आहे.

View this post on Instagram

A post shared by GiDDa CoMpAnY (@giedde)

आणखी वाचा :

हसण्याची संधी सोडू नका, पांडांचा ‘हा’ मजेशीर Viral video miss करू नका!

बच्चन पांडेचं ‘मार खाएगा’ पाहा Dwayne Bravo स्टाइलमध्ये! Social mediaवर ‘या’ Videoचा धुमाकूळ…

चिमुरडीची Style पाहिली का? Kacha Badamवर अशी थिरकली की, पुन्हा पुन्हा पाहाल ‘हा’ Viral video

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.