VIDEO | तिला स्कूटरवर उलटं मांडीवर बसवून किसिंग करत शहरभर फिरणाऱ्याचा पोलीस घेतायत शोध

पोलिस अधिकाऱ्यांनी या जोडप्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके तैनात तयार केली आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलीस जवळपासच्या कॅमेऱ्यातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत आहेत. त्यांना लवकरचं ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.

VIDEO | तिला स्कूटरवर उलटं मांडीवर बसवून किसिंग करत शहरभर फिरणाऱ्याचा पोलीस घेतायत शोध
व्हायरल व्हिडीओ
Image Credit source: twitter
| Updated on: Jan 18, 2023 | 11:35 AM

लखनऊ : सोशल मीडियाच्या (Social Media) वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती मागच्या दोन दिवसांपासून एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. त्या व्हिडीओला पाहून अनेकांनी कमेंट सुध्दा केल्या आहेत. त्याचबरोबर काही नेटकऱ्यांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील लखनऊचा जिल्ह्यातील (Lucknow) आहे. स्कूटरवर गर्लफ्रेन्डला मांडीवर बसवून किसिंग करत शहरभर फिरणाऱ्या जोडप्यांचा शोध पोलिस घेत आहेत.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील सगळ्या पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आले होते. कारण या जोडप्यांची चर्चा राज्यभर सुरु आहे. लखनऊमधील सेंट्रल झोनच्या पोलिस उपायुक्त अपर्णा रजत कौशिक हा व्हिडीओ हजरतगंज परिसरातील असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या परिसरात दोघांची चौकशी सुरु केली आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी या जोडप्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके तैनात तयार केली आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलीस जवळपासच्या कॅमेऱ्यातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत आहेत. त्यांना लवकरचं ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे या जोडप्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत आणि सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्य केल्यामुळे कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कर्नाटक राज्यात मागच्या महिन्याभरापूर्वी सुध्दा असाचं एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी सुध्दा जोडपं रस्त्यात रोमांस करीत असल्याचं आढळून आलं होतं. त्यावेळी सुध्दा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.