…आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री नृत्य करण्यापासून स्वत:ला रोखू शकल्या नाहीत

कोणत्याही मंत्र्याने सर्वांसोबत प्रांजळपणे, प्रेमाने, सौजन्याने वागावं, सर्वसामान्यांच्या अनेक कार्यक्रमात सहभागी व्हावं, अशी अनेकांची आशा असते (Mamta Banerjee Dancing in Mass Wedding Ceremony)

...आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री नृत्य करण्यापासून स्वत:ला रोखू शकल्या नाहीत
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 8:53 PM

कोलकाता : आपला राजा हा आपल्यासोबत मिळून मिसळून राहावा, अशी भावना पूर्वी सर्वसामान्य जनतेची असायची. आता देशात लोकशाही आहे. मात्र, या लोकशाहीप्रधान देशात कोणत्याही मंत्र्याने सर्वांसोबत प्रांजळपणे, प्रेमाने, सौजन्याने वागावं, सर्वसामान्यांच्या अनेक कार्यक्रमात सहभागी व्हावं, अशी अनेकांची आशा असते. याच आशा जेव्हा वास्तवात साकारल्या जातात तेव्हा संबंधित नेता शेकडो लोकांच्या मनात घर करुन जातो. असाच काहीसा अनुभव पश्चिम बंगालच्या नागरिकांना आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एका कार्यक्रमात चक्क नृत्य करताना दिसल्या. त्यांच्या नृत्य करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे (Mamta Banerjee Dancing in Mass Wedding Ceremony).

ममता बॅनर्जी यांचा हा व्हिडीओ पश्चिम बंगासच्या अलीपुरद्वार जिल्ह्यातील आहे. तिथे त्या एका लग्न समारंभाच्या निमित्ताने हजर झाल्या होत्या. या लग्न समारंभात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात पारंपरिक नृत्य सुरु होता. यावेळी नृत्य करणाऱ्या काही महिलांनी ममता बॅनर्जी यांना नृत्यसाठी आग्रह केला. त्यावेळी ममता स्वत:ला रोखू शकल्या नाहीत. त्यांनीदेखील इतर महिलांसोबत मनसोक्तपणे नृत्य केलं (Mamta Banerjee Dancing in Mass Wedding Ceremony).

ममता बॅनर्जी यांचा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. त्यामुळे अनेकांना हा व्हिडीओ खुल्या मनाने शेअरही केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्री जेव्हा इतर महिलांसोबत मिळून पारंपरिक नृत्य करतात तेव्हा तो समारंभ आणखी जास्त रंगतदार होतो. बंगालच्या नागरिकांनी हाच अनुभव घेतला. ममता बॅनर्जी यांच्या याच साधेपणाचं बंगालसह देशभरात कौतुक होत आहे.

ममता बॅनर्जी यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधनी

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधनी करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यन ममता बॅनर्जी यांचा सोशल मीडियावर एका कार्यक्रमात नृत्य करण्याच्या आलेल्या व्हिडीओमागे निवडणुकीचं कारण असल्याचा अंदाज काही लोकांकडून वर्तवण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांना आकर्षित करण्यासाठी ममतांनी महिलांसोबत पारंपरिक नृत्य केल्याचं बोललं जात आहे.

मॅमता बॅनर्जी यांचा नृत्य करतानाचा व्हिडीओ

हेही वाचा : ममतादीदींना झटका, आणखी एक आमदार भाजपमध्ये; आतापर्यंत 11 नेत्यांची टीएमसीला सोडचिठ्ठी

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.