टॉयलेट सीटवर बसून हायकोर्टाच्या ऑनलाइन सुनावणीला हजर, Video तुफान व्हायरल

गेल्या काही काळापासून कोर्टाची सुनावणीही ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे. अशाच एका सुनावणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टॉयलेट सीटवर बसून हायकोर्टाच्या ऑनलाइन सुनावणीला हजर, Video तुफान व्हायरल
Viral Video
| Updated on: Jun 27, 2025 | 4:43 PM

सध्याच्या आधुनिक युगात अनेक कामे घरात बसून ऑनलाईन करता येतात. बरेच लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. यामुळे वेळ आणि पैशांचीही बचत होते. गेल्या काही काळापासून कोर्टाची सुनावणीही ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे. अशाच एका सुनावणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक व्यक्ती टॉयलेट सीटवर बसून हायकोर्टाच्या ऑनलाइन सुनावणीला हजर असल्याचे दिसत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना 20 जून 2025 रोजी घडली. गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निर्जर एस देसाई यांच्यासमोर एका प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या सुनावणीला ‘सरमद बॅटरी’ नावाने लॉग इन असलेल्या एका व्यक्तीने हजेरी लावली. सुरुवातीला एका व्यक्तीचा चेहरा स्क्रीनवर दिसतो, तसेच या व्यक्तीने गळ्यात ब्लूटूथ इअरफोन घातलेला असल्याचे दिसत आहे. सुरुवातीला हा व्यक्ती घरात बसलेला असल्याचे दिसते.

सुनावणी सुरु झाल्यानंतर थोड्या वेळाने हा व्यक्ती फोन बाजूला ठेवतो, त्यावेळी तो घरातील सोफ्यावर नव्हे तर टॉयलेट सीटवर बसलेला असल्याचे दिसतो. थोड्या वेळाने हा व्यक्ती बाथरूममधून बाहेर पडताना दिसतो. त्यानंतर तो काही वेळ स्क्रीनवरून गायब होतो आणि नंतर पुन्हा एका रुममध्ये बसलेला दिसतो.

कोण आहे हा व्यक्ती?

न्यायालयातील नोंदींनुसार हा व्यक्ती एका प्रकरणातील एफआयआर रद्द करण्यासाठी हजर झाला होता. दोन्ही पक्षांनी सविस्तर विचार केल्यानंतर न्यायालयाने एफआयआर रद्द केला. यानंतर या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, याआधीही ऑनलाइन सुनावणीदरम्यान अशा घटना घडल्या होत्या. एप्रिलमध्ये गुजरात उच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान एका व्यक्ती कॅमेऱ्यासमोर सिगारेट पीत होता. त्यामुळे न्यायालयाने त्याला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर आताही गुजरातमधूनच हे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.