AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाण्याखाली सापडलं तब्बल 1200 वर्ष जुनं शहर! काय केला वास्तूविशारदानं दावा? वाचा सविस्तर

Underwater old ancient city : एका माजी वास्तुविशारदाने (Architect) 1200 वर्षे जुने शहर पाण्याखाली सापडल्याचा दावा केला आहे. क्रॅकपॉट जॉर्ज गेले (Crackpot George Gelé) या अमेरिकन आर्किटेक्टचे नाव आहे.

पाण्याखाली सापडलं तब्बल 1200 वर्ष जुनं शहर! काय केला वास्तूविशारदानं दावा? वाचा सविस्तर
पाण्यात जुनं शहर सापडल्याचा दावा करणारे वास्तूविशारद जॉर्ज गेलेImage Credit source: डेली स्टार
| Updated on: Mar 07, 2022 | 12:16 PM
Share

Underwater old ancient city : एका माजी वास्तुविशारदाने (Architect) 1200 वर्षे जुने शहर पाण्याखाली सापडल्याचा दावा केला आहे. क्रॅकपॉट जॉर्ज गेले (Crackpot George Gelé) या अमेरिकन आर्किटेक्टचे नाव आहे. मेक्सिकोच्या (Mexico) आखातातील चांडलूर बेटांवर पाण्याखालील प्राचीन शहराचे अवशेष सापडल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे. गेले सांगतात, की त्यांना पाण्याच्या खोलीतून सापडलेले दगड हे प्राचीन शहरात बांधलेल्या इमारतींचे अवशेष आहेत, असे वाटते. जॉर्ज गेले यांनीही प्राचीन शहराच्या अवशेषांसह पिरॅमिड सापडल्याचा दावा केला होता. त्यांनी सांगितले, की 12,000 वर्ष जुन्या शहराचे अवशेष सापडलेल्या ठिकाणी त्यांनी 44 वेळा भेट दिली होती. दरम्यान, 1200 वर्षे जुने शहर शोधण्याच्या त्यांच्या दाव्यावर तज्ज्ञांना मात्र फारसा विश्वास नाही.

मिसिसिपी नदीच्या खाली दगड टाकले आणि…

पाण्यात सापडलेल्या या ग्रॅनाइट शहराच्या मध्यभागी एक पिरॅमिडही असल्याचा दावा माजी वास्तुविशारद गेले यांनी केला आहे. त्यांनी डब्ल्यूडब्ल्यूएल-टीव्हीला सांगितले, की येथे शेकडो इमारती आहेत, ज्या वाळू आणि गाळाने झाकलेल्या आहेत. त्या गिझाच्या ग्रेट पिरॅमिडशी संबंधित आहेत. गेले यांच्या म्हणण्यानुसार, कोणीतरी मिसिसिपी नदीच्या खाली एक अब्ज दगड टाकले आणि ते बाहेर गोळा केले, ज्याचे नंतर न्यू ऑर्लीन्स बनले.”

50 वर्षांपासून सुरूय अभ्यास

‘डेली स्टार’नुसार, गेले जवळपास 50 वर्षांपासून ‘मोठ्या इमारतींचे अवशेष’ आणि ‘महान पिरॅमिड्स’चा अभ्यास करत आहेत. अलीकडे, जेव्हा ते व्होलनाव येथून समुद्रात गेले तेव्हा त्यांना कथितरित्या 1200 वर्षे जुने ग्रॅनाइट शहर सापडले. त्यांनी ज्या जागेवर शहर मिळवल्याचा दावा केला, तो याआधीही स्थानिक चर्चेचा विषय ठरला आहे. कारण येथील मच्छिमार अनेकवेळा विचित्र खडक आपल्या जाळ्यात अडकल्याची माहिती देत ​​असतात.

त्यांच्या सिद्धांतांवर तज्ज्ञांची शंका

पाण्यात एवढी जाड आणि घनदाट ग्रॅनाइटची रचना कोण बांधू शकेल, असे प्रश्न उपस्थित केले जात होते. या पिरॅमिडल रचनेची उत्पत्ती, वय आणि उद्देश याबद्दल गेले यांचे मनोरंजक सिद्धांत आहेत. त्यांच्या सिद्धांतांवर तज्ज्ञ शंका घेतात.

आणखी वाचा :

‘असे’ आनंदाचे क्षण नवी आशा देतील? रशिया-युक्रेन युद्धादरम्यान ‘हा’ भावुक video होतोय Viral

काका ऐकत नाहीत आता..! Michael Jacksonलाही दिलीय टक्कर, Viral dance video पाहून हसून हसून लोटपोट व्हाल

‘आम्ही तिकीट काढत नसतो’ म्हणणाऱ्या खोडकर प्रवाशांना Conductorनं दाखवला इंगा! Funny video viral

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.