
छत्तीसगडच्या अंबिकापूर जिल्ह्यात शनिवारी एक हृदयद्रावक घटना घडली. 35 वर्षीय व्यवसायी इंद्रजीत सिंह बाबरा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना संगम चौकात असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. काळीज पिळवटून टाकणारा CCTV फुटेज सध्या सगळीकडे व्हायरल झाले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, इंद्रजीत सिंह स्कूटी सुरू करत होते, तेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. आजूबाजूला अनेक लोक उपस्थित होते, पण कोणीही तात्काळ त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. एखाद्या व्यक्तीने त्यांच्याकडे लक्ष दिले असते कदाचित त्यांचा जीव वाचवता आला असता. कुटुंबीयांना या अकस्मात घटनेमुळे मोठा धक्क्या बसला आहे.
अंबिकापुर जिले में बीच चौराहे पर एक युवक की हार्ट अटैक से मौत। देखें LIVE वीडियो… @SurgujaDist #Chhattisgarh pic.twitter.com/jnPfcOT4CT
— Haribhoomi (@Haribhoomi95271) May 3, 2025
कार चालकाने 3 महिलांना धडक दिली, एकाचा मृत्यू
दरम्यान, 2 मे रोजी शुक्रवारी राजधानीत एक हृदयद्रावक हिट अँड रनची घटना घडली. तेलीबांधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात कार चालकाने सकाळच्या वॉकसाठी गेलेल्या दोन तरुणी आणि एका महिलेला वेगाने धडक दिली. त्यानंतर घटनास्थळावरून त्या व्यक्तीने पळ काढला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य दोन जखमींना मेकाहारा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत महिलेची प्रकृती चिंताजनक होती, असे सांगितले जात आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे, पण आरोपी कार चालक अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.