घटस्फोट मिळाल्याचं सेलिब्रेशन अंगाशी, बंजी जंपिंग करायला गेला; 70 फुटावर दोरी तुटली आणि मग…

| Updated on: May 07, 2023 | 10:40 AM

पत्नीपासून घटस्फोट मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी एक तरुण बंजी जंपिंग करायला गेला. त्यानंतर तो 70 फुटावरून खाली कोसळला. या अपघातामुळे तो जायबंदी झाला आहे. या भयानक दुर्घटनेनंतर त्याची झोपच उडाली आहे.

घटस्फोट मिळाल्याचं सेलिब्रेशन अंगाशी, बंजी जंपिंग करायला गेला; 70 फुटावर दोरी तुटली आणि मग...
Bungee Jumping Accident
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : बायकोपासून घटस्फोट मिळाल्याचा आनंद साजरा करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं. पत्नीपासून घटस्फोट मिळताच हा तरुण सेलिब्रेशन करण्यासाठी बंजी जंपिंग करायला गेला. त्यावेळी एक मोठी दुर्घटना घडली. हा तरुण बंजी जंपिंग करताना हा तरुण 70 फुटावर गेला. अन् अचानक दोरी तुटली. त्यामुळे तो 70 फुटावरून खाली कोसळला. त्यामुळे त्याच्या मानेला मोठी दुखापत झाली आहे. या तरुणाचं नाव राफेस दोस सांतोस टोस्टा असं आहे. तो ब्राझिलचा राहणारा आहे. 22 वर्षीय राफेल हा ब्यूटी स्पॉट येथे गेले होते. तिथेच ही दुर्घटना घडली.

या अपघातातून राफेल बचावला आहे. त्यानंतर त्याने मीडियासी संवादही साधला. मी अत्यंत शांत व्यक्ती आहे. सध्याच्या काळात माझ्या आयुष्यात अनेक घटना घडल्या. घटस्फोट घेतल्यानंतर मला आयुष्याचा आनंद घ्यायचा होता. त्यामुळे मी वेड्यासारख्या अनेक गोष्टी केल्या. मी माझ्या आयुष्याचं कदरच केली नाही, असं राफेल म्हणाला. राफेल त्याच्या पुतण्या आणि तीन मित्रांसह बंजी जंपिंग करायला गेला होता. एक तर बायकोपासून मिळालेला घटस्फोट आणि राफेलचा वाढदिवस या दोन्ही गोष्टी जुळून आल्याने त्याने मोठं सेलिब्रेशन करण्याचा निर्णय घेतला होता.

हे सुद्धा वाचा

आकाशातून थेट समुद्रात कोसळला

जेव्हा राफेल 70 फुटावर गेला. तेव्हा अचानक दोरी तुटली. त्याचं नशिब इतकं बलवत्तर होतं की तो डोंगराळ भागात पडला नाही. तो समुद्रात पडला. त्यामुळे त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली. त्याच्या मणक्याला मार लागला. कंबर, चेहरा आणि शराराच्या काही भागांवर मोठी दुखापत झाली. पण नशीब बलवत्तर म्हणून तो या भयानक अपघातातूनही बचावला.

जिवंत आहे याचाच आनंद

खाली उडी घेताना ही दोरी माझं वजन पेलणार नाही, असं मी मस्करीत म्हटलं होतं. माझ्या आईनेही मला तिथे जाण्यास मज्जाव केला होता. पण मी ऐकलं नाही. आता माझं आयुष्य पूर्वी सारखं राहणार नाही. मी जिवंत आहे, एवढ्याच गोष्टीचा आनंद आहे. हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. या अपघाताला तीन महिने झालेत. पण मी त्या धक्क्यातून अजून बाहेर पडलो नाही. मी फिजिओथेरपी आणि ट्रीटमेंटचे सेशन घेत असूनही मी त्या मानसिक धक्क्यातून सावरलेलो नाहीये, असं तो म्हणाला.

झोप उडाली

मला पूर्वी सारखी झोप येत नाहीये. मला वाईट स्वप्न पडत आहेत. झोपतानाही भीती वाटतेय, असंही त्याने सांगितलं. राफेल हा प्रोडक्शन ऑपरेटर आहे. तो एका फॅक्ट्रीत प्रोडक्शन निरीक्षक म्हणून काम करतो. या दुर्घटनेनंतर तो त्याच्या कार्यालयातही जात नाहीये.