टांगा लांबच लांब होताच बॉयफ्रेंडही वाढले; या अजब तरुणीचे गजब कारनामे माहित आहे काय?

या मॉडेलने आपले पाय लांब करण्यासाठी एक कोटींहून अधिक पैसे खर्च केले आहेत. किशोरवयात माझा खूप छळ झाला होता, त्यानंतर मला हा निर्णय घ्यावा लागला.

टांगा लांबच लांब होताच बॉयफ्रेंडही वाढले; या अजब तरुणीचे गजब कारनामे माहित आहे काय?
Image Credit source: instagram
| Updated on: May 04, 2023 | 2:45 PM

आतापर्यंत तुम्ही ऐकले असेल की लोक अधिक सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा (plastic surgery)  अवलंब करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की आता लोक पायही लांब करू लागले आहेत. त्यासाठी महागड्या शस्त्रक्रिया (surgery) केल्या जात आहेत. 31 वर्षीय थेरेसिया फिशरनेही असेच काहीतरी केले आहे. ती सेलिब्रिटी बिग ब्रदर शोच्या जर्मन आवृत्तीमध्ये दिसली होती. अनेक वर्षे टोमणे ऐकून शेवटी तिने तिचे पाय मोठे करण्याचा (lengthening legs surgery) विचार केला.

थेरेसियाच्या दोन ऑपरेशननंतर तिच्या पायात टेलिस्कोपिक रॉड घालण्यात आले. आता तिची लांबी सहा फूट झाली आहे. याचा तिला खूप फायदा होत असल्याचे मॉडेलचे म्हणणे आहे. आहे. तिला सहा नवीन बॉयफ्रेंड मिळाले आहेत. आत्मविश्वास वाढला आहे. तसेच आनंद आणि समाधान मिळाले. ती सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे.

 

इन्स्टाग्रामवर तिचे 1.45 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. डेली स्टारने आपल्या वृत्तात स्थानिक माध्यमांच्या वृत्ताचा हवाला देत म्हटले आहे की, ऑपरेशननंतर डॉक्टरांनी तिची लांबी 14 सेंटीमीटर (5.5 इंच) वाढवली आहे.

सोशल मीडियावर होतंय ट्रोलिंग

थेरेसिया म्हणते की, किशोरवयात लोक तिला खूप त्रास देत असत. तिने आपल्या जुन्या जोडीदारासाठी आणि मॉडेलिंग करिअरसाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

 

ती म्हणते, ‘मी आता माझ्या पायांमुळे आनंदी आणि समाधानी आहे, पण मला इंटरनेटवर द्वेषाचाही सामना करावा लागत आहे. याचा मला खूप त्रास होतो. पाय वाढवण्याच्या प्रक्रियेने, मी स्वत:ला परत सापडले आहे. आणि ट्रोलिंगमुळे माझ्या मनावर जो आघात झालाय, त्यावर मात केली आहे. पण आता पुन्हा माझा छळ होत आहे. माझा इतका तिरस्कार का केला जातोय? हे सर्व पैसे मी माझ्या मॉडेलिंग फीमधून दिले आहेत, असेही तिने नमूद केले.