
सोशल मीडियावर कधीकधी अशा गोष्टी व्हायरल होत असतात की ते पाहून लोकं आश्चर्यचकित तर होतातच पण अशा व्हिडिओवर विश्वास ठेवणेही कठीण होते. तर सध्या एक असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे , ज्यामध्ये एक माकड माणसाप्रमाणे रस्त्यावर गाडी चालवताना दिसतोय पण गाडी नीट बॅलेंस होत नाहीये , त्यामुळे रस्त्यावर गाडी चालवत या माकडाने मात्र कहर केला आहे . त्यातच ही व्हिडिओ पाहून मात्र लोकांना प्रश्न पडला आहे की हा व्हिडिओ खरा आहे की एआयच्या मदतीने तयार केला आहे.
व्हिडिओमध्ये, तुम्ही माकडाला गाडी चालवताना पाहू शकता. सुरुवातीला असे वाटते की तो एक चांगला ड्रायव्हर असेल, परंतु गाडी पुढे जाताच व्हिडिओ पाहणाऱ्यांचा मात्र हा भ्रम तुटतो. कारण माकड प्रथम दोन किंवा तीन दुचाकीस्वारांना धडकतो आणि नंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या इतर वाहनांना धडकतो. त्यानंतरही तो थांबत नाही, उलट गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. असे आश्चर्यकारक दृश्य तुम्ही क्वचितच पाहिले असेल. मात्र या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबद्दल बोलायचे झाले तर ही घटना खरी नाही; हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार केली गेली आहे, ज्यामुळे ती पूर्णपणे खरोखर असल्याचं अनेकांना वाटत आहे.
हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर @ImJPramod नावाच्या आयडीने शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “जेव्हा तुम्ही बाजारात जाता तेव्हा तुमची गाडी लॉक करा. एखाद चोरच ती गाडी चोरेल असे नाही; कधीकधी तुम्हाला अपेक्षा नसलेले प्राणी देखील तुमची गाडी चोरू शकतात.”
हा 15 सेकंदांचा व्हिडिओ 63 हजारा हून अधिक वेळा पाहिला गेला आहे, शेकडो लोकांनी तो लाईक केला आहे आणि विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने विनोदाने म्हटले आहे की, “आज 10-20 लोकांना मारल्यानंतरच हे माकड थांबेल,” तर दुसऱ्याने म्हटले आहे की, “मोनकेश भाई वेडा झाला आहे.” दरम्यान, काही वापरकर्ते म्हणत आहेत की, “हा एक एआय व्हिडीओ आहे, तो काहीही करू शकतो.”
तर आजच्या आधुनिक काळात व टेक्नॉलॉजिच्या युगात असे एआयच्या मदतीने तयार केलेले भन्नाट व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पहा
किसी मार्केट में जाओ तो कार ज़रूर लॉक कर के जाओ।
ज़रूरी नहीं कि चोर ही ले भागे कभी-कभी ऐसे महाशय भी कार उठा ले जाते हैं जिनकी आप कल्पना भी नहीं करते। pic.twitter.com/9YBXNy4ETo— Pramod Yadav (@ImJPramod) November 20, 2025