
Viral Video: सध्याच्या घडीला रील आयुष्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. आपण बनवलेली रील व्हायरल होण्यासाठी नेटकरी नको ते प्रयत्न करतात. ज्यामुळे मोठी किंमत मोजावी लागते. आता देखील असंच काही झालं आहे. समुद्रकिनारी आई रील बनवत राहिली आणि लेक समुद्राच्या लाटांमध्ये वाहून गेली. सध्या चिमुकलीचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल… या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रील बनवण्यासाठी एका महिलेने स्वतःच्याच मुलीला मरणाच्या दारात ढकललं.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर लोकं कमेंट करत संताप व्यक्त केलं आहे. सांगायचं झालं तर, व्हिडीओ नक्की कुठला आहे अद्याप समजलेलं नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती मुलगी खूप आनंदी आहे आणि समुद्राच्या लाटांचा आनंद घेत आहे. पण, लाटा तिच्या दिशेने खूप वेगाने येत आहेत.
यह लापरवाह मां अपनी बेटी की समुंदर के किनारे Reel बना रही थी, लेकिन यह पल सेंकडों में खौफनाक मंजर में बदल गया।
समुंदर की ऊंची लहरें इस बच्ची को समुंदर में खीच ले गईं।
समुद्र बहुत सुंदर है, लेकिन साथ में निर्दयी भी है। कभी मत भूलिए कि इसकी ताकत कितनी जल्दी जानलेवा बन सकती है। pic.twitter.com/4iOQ8Lx2vf
— Dr. Sheetal yadav (@Sheetal2242) June 10, 2025
व्हिडीओमध्ये लाटा उंच उसळताना दिसत आहेत आणि मुलीची आई तिचा व्हिडिओ बनवत आहे. धोका असूनही ती हे सर्व करत आहे. दरम्यान, अचानक एक लाट येते आणि त्या लाटेत मुलगी वाहून जाते. यानंतर, तिथे उपस्थित असलेले लोक ओरडू लागतात.
लोक हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी संताप देखील व्यक्त केला. तर अनेक लोकं म्हणत आहेत की, व्हायरल होत असलेला व्हिडीओ जुना आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी आईवर संताप व्यक्त केला आहे. लोक म्हणतात की आईला समोरून एक जोरदार लाट येत असल्याचे दिसते, तरीही ती व्हिडिओ बनवत आहे. आईला मुलीला त्या लाटेत पाठवण्याची काय गरज होती?
तर अनेक विचारत आहेत, मुलीसोबत काय झालं… सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ जून महिन्यात पोस्ट करण्यात आला आहे. पण आता तुफान व्हायरल होत आहे.