AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Points Table : पहिल्या डबल हेडरनंतर पहिल्या स्थानी कोण? पॉइंट्स टेबलमध्ये जोरदार रस्सीखेच

IPL 2026 Points Table : राजस्थानने गुजरातला पराभूत करुन पॉइंट्स टेबलमध्ये कमाल केली आहे. राजस्थानने पुन्हा एकदा पॉइंट्स टेबलमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. जाणून घ्या इतर संघांची पॉइंट्स टेबलमधील स्थिती काय आहे.

IPL 2026 Points Table : पहिल्या डबल हेडरनंतर पहिल्या स्थानी कोण? पॉइंट्स टेबलमध्ये जोरदार रस्सीखेच
Rajasthan Royals IPL 2026Image Credit source: PTI
| Updated on: Apr 05, 2026 | 2:48 AM
Share

राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्स विरुद्ध 6 धावांनी थरारक विजय मिळवला. गुजरातचा हा 19 व्या मोसमातील सलग दुसरा विजय ठरला. राजस्थानने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये कमाल केली आहे. राजस्थानने पुन्हा एकदा पॉइंट्स टेबलमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार, राजस्थान आणि दिल्ली कॅपिट्स अजिंक्य आहेत. राजस्थान आणि दिल्लीने 2 पैकी 2 सामने जिंकले आहेत. मात्र दिल्लीच्या तुलनेत राजस्थानचा नेट रनरेट हा चांगला आहे. त्यामुळे दिल्ली समसमान गुण असूनही दुसऱ्या स्थानी विराजमान आहे.

शेवटच्या षटकात सामना निकाली

गुजरात विरुद्ध राजस्थान यांच्यातील सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. राजस्थानच्या या विजयाचा तुषार देशपांडे यहा हिरो ठरला. गुजरातला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांची गरज होती. तर गुजरातकडून राशिद खान बॅटिंग करत होता. मात्र राशिदसमोर तुषारने अचूक बॉलिंग केली. तुषारने टाकलेल्या या भेदक 6 चेंडूत गुजरातला 4 धावाच करता आल्या. राजस्थानने अशाप्रकारे हा सामना 6 धावांनी जिंकला. राजस्थानचा हा सलग दुसरा विजय ठरला.

टॉप 3 मध्ये अजिंक्य संघ

राजस्थानने गुजरातला पराभूत करुन 19 व्या मोसमात सलग 2 सामने जिंकणारी तिसरी टीम ठरली. राजस्थान व्यतिरिक्त दिल्ली कॅपिट्ल्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांनी आपले पहिल्या 2 सामन्यांत विजय मिळवला आहे. मात्र नेट रनरेटमुळे राजस्थान पहिल्या, दिल्ली दुसऱ्या आणि पंजाब किंग्स तिसऱ्या स्थानी आहे.

चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानी असलेल्या संघांनी किमान 1 सामना जिंकलाय. आरसीबीने विजयी सलामी दिलीय. आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. पाचव्या आणि सहाव्या स्थानी सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स विराजमान आहे. हैदराबादची 19 व्या पर्वात पराभवाने सुरुवात झाली. मात्र हैदराबादने दुसऱ्या सामन्यात पलटवार करत विजय मिळवला. तर मुंबईने 2012 नंतर यंदा पहिल्यांदाच आपल्या मोहिमेची सुरवात विजयाने केली.

गुजरात तिसरी टीम

गुजरातचा राजस्थान विरुद्धचा सामना हा या स्पर्धेतील दुसरा पराभव ठरला. गुजरात या मोसमात सलग 2 सामने गमावणी तिसरी टीम ठरली. गुजरात व्यतिरिक्त, कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्सनेही सलग 2 सामने गमावलेत. तर लखनौ सुपर जायंट्सही विजयाचं खातं उघडण्यात अपयशी ठरलीय.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...