AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील महाकाय व्हेल मासा अचानक किनाऱ्यावर आला… गूढ मृत्यू; कारण काय?

स्पेनमधील वैलेन्सिया येथे एक महाकाय व्हेल मासा गूढपणे किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळला. 30 फूट लांब आणि 6.5 टन वजनाचा हा देवमासा समुद्राच्या इतक्या जवळ येऊन का मेला, हे एक रहस्य बनले आहे. त्याच्या शरीरावर कोणतीही जखम नसल्याने जहाजाची धडक हे कारण दिसत नाही. समुद्रातील वाढते प्रदूषण की अन्य आजार, यामागे नेमके काय कारण आहे, हे शोधण्यासाठी वैज्ञानिकांनी नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.

जगातील महाकाय व्हेल मासा अचानक किनाऱ्यावर आला... गूढ मृत्यू; कारण काय?
| Updated on: Feb 21, 2026 | 4:15 PM
Share

तुम्ही अनेकदा समुद्र पाहिला असेल. समुद्रावर गेला असाल. भरती आणि ओहोटीचा आनंद घेतला असेल. जेव्हा समुद्र उधाणलेला असतो तेव्हा तो आपल्यासोबत बरंच काही किनाऱ्यावर घेऊन येतो. समुद्राच्या पोटातील सर्व कचरा आणि टाकाऊ गोष्टी किनाऱ्यावर येतात. लाटांसोबत कधी कधी मृतदेहही किनाऱ्यावर येतात. स्पेनमध्ये अशीच एक लाट आली, पण त्यासोबत भलतंच काही आलं. ते पाहून सर्वच हैराण झाले. स्पेनमधील वैलेन्सिया या पर्यटकांनी नेहमीच गजबलेल्या शहरात विपरीतच घटना घडली. ती वाचून तुम्हीही थक्क व्हाल.

शहरातील प्रसिद्ध ‘रियल क्लब नॉट्टिको’ मरीनाजवळ अचानक पाण्यात महाकाय असं काही तरी दिसलं. जवळ गेल्यावरहे साधं काहीतरी नाही, तर 30 फूट लांब आणि 6.5 टन वजनाचा देवमासा असल्याचा दिसलं. समुद्राच्या खोल पाण्यात राहणाऱ्या या प्राण्याने मानवी वस्तीच्या इतक्या जवळ येऊन सगळ्यांना थक्क करून सोडलं. या विशाल माश्याला बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला प्रचंड मोठी क्रेन बोलवावी लागली. देवमासा हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मासा आहे. तसेच तो समुद्रातील सर्वात मोठा प्राणी आहे. वैलेन्सियाच्या या प्रगत भागात हा व्हेल अर्थात देव मासा दिसला. तेव्हा ब्रिटिश पर्यटक आणि स्थानिकांसाठी हा क्षण एखाद्या सिनेमातील दृश्यासारखा होता.

मृत्यूचं खरे कारण काय?

हा मासा खूप मोठा आणि जड असल्यामुळे तिला हलवणं कठीण होतं. मोठ्या क्रेनच्या मदतीने 9 मीटर लांबीच्या या व्हेलला समुद्रकिनाऱ्यावरून ओढून कोरड्या जमिनीवर ठेवण्यात आलं. तिचा प्रचंड मोठा आकार पाहून लोक आश्चर्यचकित झाले. प्रशासनासाठी ही कामगिरी म्हणजे एक मोठं आव्हान होतं. पण वैज्ञानिकांसाठी तिचा मृत्यू कशामुळे झाला हे शोधणं अधिक कठीण होतं. साधारणपणे अशा माशाचा मृत्यू मोठ्या जहाजाला धडक लागल्यामुळे होतो, मात्र माश्याच्या शरीरावर कोणतीही जखमा किंवा रक्ताचे डाग दिसत नव्हते. त्यामुळे जहाजाशी धडक झाली नसावी, असे दिसत होते. मग प्रश्न निर्माण झाला की हा मासा आजारी होता का? की समुद्रातील वाढतं प्रदूषण व्हेलच्या मृत्यूचं कारण ठरलं? हे समजण्यासाठी पशुवैद्य आणि वैज्ञानिकांनी व्हेलच्या शरीराचे नमुने घेऊन तपासणीसाठी माद्रिदमधील प्रसिद्ध विद्यापीठात पाठवले आहेत.

कधी समजेल कारण ?

तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रचंड मोठ्या माशाचे अवशेष एका मोठ्या ट्रकवर ठेवले. देवमासा जगभरातील समुद्रात आढळतात, पण मानवी शिकार आणि लालसा यामुळे आता त्यांची संख्या कमी होत आहे. ही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांना ‘असुरक्षित’ प्रजाती म्हणून नोंदवले आहे. या प्रजातीचा सर्वात मोठा मासा हा 27 मीटर लांब आढळलेला आहे. वैलेन्सियातील सागरी तज्ज्ञांनी सांगितले की, भूमध्य समुद्रात देवमासा असणे चांगली गोष्ट आहे, पण मृत मासा सापडल्यामुळे आपल्याला समुद्र आणि त्यातील जीवांचे संरक्षण करण्यासाठी अधिक उपाय करावे लागतील. सध्या वैज्ञानिक पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत, जेणेकरून मृत्यूचं खरे कारण समजेल.

Follow Us
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी