AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

याला म्हणतात खरं प्रेम… पत्नीला रुग्णालयात पाहून नवरा ढसाढसा रडला; video पाहून नेटकरीही झाले इमोशनल

एका वृद्ध जोडप्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यावर लोक खूप कमेंट करत आहेत. व्हिडिओ खूपच इमोशनल आहे. या वृद्ध जोडप्यामधलं प्रेम यात पाहायला मिळतं.

याला म्हणतात खरं प्रेम... पत्नीला रुग्णालयात पाहून नवरा ढसाढसा रडला; video पाहून नेटकरीही झाले इमोशनल
वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले इमोशनलImage Credit source: social media
| Updated on: May 19, 2023 | 5:41 PM
Share

सोशल मीडियावर (social media)  एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल (viral video) होत आहे. ज्यामध्ये वृद्ध जोडप्यामधील प्रेम (old couple love) पाहायला मिळतं. यामध्ये एक वृद्ध महिला रुग्णालयाच्या बेडवर झोपलेली दिसत असून त्यांच्यासमोर स्टूलवर पती बसले आहे. मात्र त्यांच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत असून ते रोखू शकत नाहीत. पतीला रडताना पाहून ती वृद्ध महिलाही रडू लागते. या व्हिडिओवर अनेक लोकांच्या कमेंट्स आल्या आहेत. फेसबुकवरही अनेकांनी ते शेअर केले आहे. त्याच वेळी, इन्स्टाग्रामवर 4.64 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

वर नमूद केल्याप्रमाणे या व्हिडीओवर लोक खूप कमेंट करत आहेत. यूजर्स त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनुभव सांगत आहेत. नैना नावाच्या युजर म्हणाली की, ‘ हा व्हिडीओ पाहून मलाही रडायला येत आहे आणि माझ्या आजोबांसाठी खूप वाईट वाटत आहे. गेल्या वर्षी माझी आजी त्यांना सोडून गेली. ते रोज तिची आठव काढतात. आपल्या लोकांना असं जाऊ देणं खूप कठीण असतं. शेवटी आपल्या हातात त्यांच्या फक्त आठवणी उरतात’.

या व्हिडीओवर प्रतिक्षा नावाच्या युजरनेही कमेंट करत तिच्या मनातले भाव सांगितले आहेत. ‘ (माझी) आई गेल्यानंतर मी वडिलांनाही याच अवस्थेत पाहिलंय. हे (व्हिडीओ) पाहून मन खरंच खूप दुखावलं गेलंय. आपण आयुष्यात नेहमी आपल्या पालकांचा आदर , मान राखला पाहिजे. त्यांच्यासाठी वेळ काढला पाहिजे. आयुष्याचा काहीच भरोसा नाहीये. पालकांचं मन कधी दुखवून नका रे… ‘ अशा आशयाची कमेंट तिने केली .

View this post on Instagram

A post shared by GiDDa CoMpAnY (@giedde)

आजी आजोबांची सांगितली गोष्ट

आंचल नावाच्या युजरने सांगितले की, ‘माझ्या आजीचे गेल्या वर्षी निधन झाले. माझे आजोबा रडत होते. संपूर्ण अंत्यसंस्कारात मला त्यांना आधार द्यायचा होता, पण त्यांच्या आयुष्यातील पोकळी भरून काढण्यासाठी मी काहीच करू शकले नाही . आजोबा नेहमी म्हणतात, स्वर्गात घेऊन जायला ती ( आजी) नक्की येईल, अशा स्वरूपात तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मीरा मज नावाच्या युजरनेही यावर कमेंट केली आहे. तिने लिहिले की, ‘आपल्या आजी-आजोबांनी वयाच्या 14 किंवा 15 व्या वर्षी एकमेकांशी लग्न केले होते. आणि मग आपापसात प्रेमाचे बंध निर्माण झाले. त्यांनी एकमेकांना वाढताना, दुःखात, सामंजस्यात, कठीण काळात एकत्र पाहिले आहे, परंतु कधीही वेगळे होण्याचा प्रयत्न केला नाही. आणि आता ते त्यांच्या 70, 80 किंवा 90 व्या वयात आहेत. यापैकी एखाद्याला त्याच्या दीर्घकाळाच्या जोडीदाराला त्यांच्या मृत्यूशय्येवर पाहून कसं वाटत असेल याची कल्पना करा. हे खूप दुःखदायक आहे.’

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?