Video : हजारो रूपयांच्या मोबाईलचा दगडाने ठेचून चुराडा! पुढच्या क्षणी धुराचे लोट, पाहा नेमकं काय घडलं…

giedde या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला हजारो लोकांनी पाहिलंय. तर साडे तीन हजारांहून अधिकांनी लाईक केलंय.

Video : हजारो रूपयांच्या मोबाईलचा दगडाने ठेचून चुराडा! पुढच्या क्षणी धुराचे लोट, पाहा नेमकं काय घडलं...
| Edited By: | Updated on: May 21, 2022 | 1:33 PM

मुंबई : आपल्याकडे चांगला फोन असावा, असं प्रत्येकाला वाटत असतं. आपल्या आवडीचा फोन घेता यावा यासाठी सर्वसामान्य माणूस जमा खर्चातून चार पैसे बाजूला ठेवत खरेदी करतो. पण आपण आपल्या आवडीने घेतलेला फोन दगडाने फोडल्याचं कधी पाहिलं आहे का? असं शक्यतो घडत नाही. पण सध्या सोशल मीडियावर (social media) एक व्हीडिओ व्हायरल (viral video) होत आहे. यात एक तरूण त्याचा फोन दगडाने ठेचताना दिसतोय.

व्हायरल व्हीडिओ

सोशल मीडियावर सध्या एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात एक मुलगा त्याच्या हातात मोबाईल पकडून उभा आहे. तो काही व्हीडीओ पाहताना दिसतोय. तो मोबाईल सुरू असल्याचं दाखवण्यासाठी स्क्रोल करतो. मग तो हा मोबाईल आधी एका मोठ्या दगडावर ठेवतो आणि मग पुढे दुसऱ्या आणखी एका दगडाने तो स्वतःचा हा मोबाईल ठेचतो. यात त्याच्या मोबाईलचा अक्षरशः चुराडा होऊन जातो. त्यानंतर तो आणखी एक ठोका त्या मोबाईलवर टाकतो. त्याला असं मोबाईल फोडताना पाहून सगळेच आश्चर्यचकीत होत आहेत.

giedde या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला हजारो लोकांनी पाहिलंय. तर साडे तीन हजारांहून अधिकांनी लाईक केलंय. तर अनेकांनी कमेंट करत या घटनेवर आश्चर्य व्यक्त केलंय. एकाने म्हटलंय की, हा मुलगा गर्भ श्रीमंत असावा, त्याचमुळे तो असं कृत्य करतोय. दुसरा म्हणतो, हा चोरीचा फोन असावा म्हणून तो फोडतोय. तिसरा म्हणतो, तुला नको होता तर मला फोन द्यायचा… मी तरी वापरला असता फोडण्यापेक्षा…