AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला आवडते का Online Shopping? या महिलेला ऑर्डर न केलेल्या गोष्टीसाठी भरावे लागले 58 हजार, वाचा

तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग आवडतं की ऑफलाइन शॉपिंग? जर तुम्हाला दुकानात जायचा कंटाळा येत असेल आणि तुम्ही ऑनलाइनच सगळं मागवत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. एका महिलेसोबत मोठा फ्रॉड झाला. तिला अशा गोष्टीसाठी ५८ हजार भरावे लागले जे तिने कधी मागवलंच नव्हतं. वाचा काय आहे सविस्तर

तुम्हाला आवडते का Online Shopping? या महिलेला ऑर्डर न केलेल्या गोष्टीसाठी भरावे लागले 58 हजार, वाचा
online order online shopping
| Updated on: Sep 16, 2023 | 8:02 PM
Share

मुंबई: Online Shopping करणं म्हणजे जितकं ते सोपं वाटतं तितकंच अवघड. इंटरनेटचं जाळं सर्वदूर पसरलेलं आहे. घरबसल्या आज आपण काहीही मागवू शकतो, त्यासाठी आपल्याला दुकानात जायची गरज नाही. पण याने आपला नुसताच फायदा होतोय का? नाही. यात अनेक नुकसान आहेत. जसं जसं इंटरनेटचं जाळं वाढत गेलं, गोष्टी सोप्या होत गेल्या तसतसं ऑनलाइन होणारी फसवणूक देखील वाढली. ही फसवणूक कशीही होऊ शकते. आजकाल असे अनेक किस्से समोर येतायत. लोकं ऑनलाइन मागवतात काहीतरी एक आणि येताना येतं काहीतरी एक. तुमच्याही बघण्यात अशा अनेक गोष्टी आल्या असतील किंवा कदाचित तुमच्या सोबतही असं काही घडलेलं असू शकतं.

५८ हजार रुपये कापण्यात आले

असाच एक किस्सा घडलाय. एका महिलेला तिने ऑर्डर न केलेल्या गोष्टीसाठी ५८ हजार रुपये भरावे लागलेत. काय किस्सा आहे हा? जाणून घेऊयात. झालं असं की या महिलेच्या घरी एक पार्सल आलं आणि तिच्या अकाउंट मधून तब्बल ५८ हजार रुपये कट झाले. हे पार्सल होतं कंडोमचं. हैराण करणारी गोष्ट तर ही आहे की हे पार्सल अमेझॉन वरून आलं आणि यात तब्बल एक हजार कंडोम होते. या बदल्यात महिलेच्या क्रेडिट कार्डवरून ७०० डॉलर म्हणजेच ५८ हजार रुपये कापण्यात आले. हे पार्सल जेव्हा घरी आलं तेव्हा ही महिला एका हॉस्पिटलमध्ये तिच्या पतीची सेवा करत होती. इतके पैसे कापले गेलेले बघून तिने पटकन सगळं तपासलं तर तिला हा प्रकार लक्षात आला.

महिलेला हे पैसे परत दिले

मग आता करायचं काय? तिने अमेझॉन मध्ये याबाबत तक्रार केली. अमेझॉन ने ते पार्सल परत घेण्यास नकार दिला कारण कंडोम ही फार पर्सनल गोष्ट असल्याचं अमेझॉनचं म्हणणं होतं. बऱ्याच खटाटोपानंतर शेवटी अमेझॉनने ते पार्सल परत घेतलं आणि महिलेला हे पैसे परत दिले. न्यूयॉर्क पोस्टने यासंदर्भात बातमी केलीये. जी गोष्ट आपण मागवली नाही ती गोष्ट येणे, त्याचे इतके जास्त पैसे कापले जाणे आणि यासंदर्भातली तक्रार केल्यास त्याचीही पटकन दखल न घेतली जाणे या सगळ्याने ही महिला गोंधळून गेली. ऑनलाइन शॉपिंगच्या अशा अनेक घटना व्हायरल होत असतात. तुम्हीही अशी शॉपिंग करताना काळजी घ्या.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.