Viral Video : ‘ऑस्प्रे’ची पाण्यात घुसून शिकार, पण एका चुकीमुळे सर्व मेहनत गेली वाया

| Updated on: Jan 20, 2022 | 11:21 AM

अनेकवेळा शिकार करणारे यशस्वी होतातच असं नाही. शिकार थोडीशी संधी मिळताच पळून जातो आणि शिकार करणाऱ्याची पूर्ण मेहनत वाया जाते. असाच एक व्हिडिओ(Video) समोर आला आहे.

Viral Video : ऑस्प्रेची पाण्यात घुसून शिकार, पण एका चुकीमुळे सर्व मेहनत गेली वाया
ऑस्प्रे पक्षी
Follow us on

गरुडाच्याच प्रकारातला एक पक्षी ऑस्प्रे (Osprey) शेकडो फूट उंचीवरून आपली शिकार पाहतो आणि त्यानंतर पापणी लवते न लवते तोच आपली सर्व कामं करतो. अनेक वेळा हे पक्षी (Birds) केवळ हवेत आणि जमिनीवरच नव्हे, तर पाण्यात शिरून आपली शिकार करतात. पण असं असूनही अनेकवेळा शिकार करणारे यशस्वी होतातच असं नाही. शिकार थोडीशी संधी मिळताच पळून जातो आणि शिकार करणाऱ्याची पूर्ण मेहनत वाया जाते. असाच एक व्हिडिओ(Video) समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही असाच विचार कराल.

पकड होते सैल

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक Osprey समुद्राच्या लाटांशी लढतो आणि एक मोठा मासा अगदी सहजपणे बाहेर काढतो आणि त्याच्या मोठ्या पंखांच्या मदतीनं तो हवेत उडण्याची तयारी करतो. पण या काळात त्याची पकड थोडी कमकुवत होते. मासा थोडासा हलतो आणि तो ऑस्प्रेच्या पकडीतून निसटून पाण्यात पडतो आणि ऑस्प्रे माशाशिवाय तिथून निघून जातो.

ट्विटर अकाऊंटवरून शेअर

Mark Smith Photography नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याला हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. यासोबतच यूझर्स कमेंट करून व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देत आहेत.

‘…पण आज नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.’

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूझर्स विचार करतायत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूझरनं लिहिलंय, की मला वाटतं माशाचं वजन खूप जास्त असेल, त्यामुळे ऑस्प्रेची पकड थोडीशी कमकुवत झाली. दुसऱ्या यूझरनं लिहिलंय, की ‘प्रयत्न चांगला होता पण आज नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.’

Video : Pushpaच्या अल्लू अर्जुनचा ‘असा’ही फॅन…. अप्रतिम डान्स करून जिंकलं नेटकऱ्यांचं मन

Video : चुकीला माफी नाही..! स्कूटीवर स्टंट करणं तरुणीला पडलं भारी; अशी काही आपटली, की…

सोशल मीडियाबद्दल काहीच माहिती नाही, तरीही मलावीयन संगीतकार टिकटॉकवर सुपरहिट, 80 लाखांहुन अधिक जणांनी पाहिले व्हिडीओ