Video : आली लहर केला कहर!, फोटोशूटसाठी जंगल पेटवलं, व्हीडिओवर नेटकऱ्यांचा ‘जाळ’!

टिकटॉकवर हुमैराचा हा व्हीडीओ व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये ती आपला व्हीडिओ शूट करतेय. त्यावेळी तिच्या मागे असणाऱ्या जंगलाला आग लागलेली दिसत आहे.

Video : आली लहर केला कहर!, फोटोशूटसाठी जंगल पेटवलं, व्हीडिओवर नेटकऱ्यांचा जाळ!
| Edited By: | Updated on: May 19, 2022 | 3:09 PM

मुंबई : सध्या फोटोशूटचा नवा ट्रेंड आलाय. सोशल मीडियावर प्रसिद्धी झोतात असलेले सोशल मीडियावर स्टार फोटो आणि व्हीडिओ शूट करण्यासाठी विविध ठिकाणी जातात. वेगवेगळ्या लोकेशनला जावून ते व्हीडिओ तयार करत असतात. त्यांना चांगला प्रतिसाद आणि प्रसिद्धी मिळते. पण काही वेळा ने सोशल मीडिया स्टार अशी काही कृती करतात त्यामुळे ते चर्चेत येतात. आताही अश्याच एका सोशल मीडिया स्टारचा व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यात या तरूणीने हटके फोटो शूट करण्यासाठी चक्क जंगलाला आग लावली (Forest Fire) आहे.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात यात या तरूणीने हटके फोटो शूट करण्यासाठी चक्क जंगलाला आग लावली आहे. हुमैरा असगर असं या तरूणीचं नाव आहे. या तरूणीने व्हीडिओ बनवण्यासाठी जंगल पेटवल्याचं समोर आलं आहे. हुमैरा असगरचे टिकटॉकवर 11 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिचा हा फायर व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्या इथून पाठीनगाच्या व्हीडिओमध्ये लोक तिच्या सौंदर्याचं कौतुक करत होते. आताच्या या व्हीडिओत तिच्याकडे कुणाचंही लक्ष नाहीये. तर तिच्या मागे लागलेली आग केवळ पाहिली जातेय. तिच्या या व्हीडिओवर विविध प्रतिक्रिया येत आहे.

टिकटॉकवर हुमैराचा हा व्हीडीओ व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये ती आपला व्हीडिओ शूट करतेय. त्यावेळी तिच्या मागे असणाऱ्या जंगलाला आग लागलेली दिसत आहे. यात तिने सिल्व्हर कलरचा गाऊन घातला आहे आणि व्हीडीओच्या मागे ‘पसुरी’ गाण्याचे बोल वाजत आहेत. ‘मी जिथे जाते, तिथे आग लागते’, असं कॅप्शन तिने या व्हीडीओच्या दिलं आहे.

हा व्हीडीओ PakistanNature या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. आणि पाकिस्तान सरकारला या टिकटॉक स्टारवर बंदी घालण्याची विनंती केली आहे. हुमायराला या प्रकरणी शिक्षा देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

असा व्हीडिओ पाहून नेटकरी संतापले आहेत. पर्यावरणासोबत असा खेळ करता कामा नये. पर्यावरण जपणं आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे, असं नेटकऱ्यांनी या व्हीडिओवर कमेंट केली आहे. सोबत या मुलीला शिक्षा करण्याची मागणीही करण्यात आली आहे.