VIDEO : पाकिस्तानच्या प्रसिद्ध गायकाकडून अमानुष कृत्य, भावजयला मारहाण, चाहत्यांकडून टीकेची झोड

पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक बिलाल सईद सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे (Pakistani singer Bilal Saeed beating woman)

VIDEO : पाकिस्तानच्या प्रसिद्ध गायकाकडून अमानुष कृत्य, भावजयला मारहाण, चाहत्यांकडून टीकेची झोड

लाहोर : पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक बिलाल सईद सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत बिलाल आणि एका व्यक्तीमध्ये झडप सुरु आहे. काही लोक त्याला आवरत आहेत. यावेळी एक महिलादेखील तिथे उपस्थित आहे. व्हिडीओत बिलाल महिलेवरही हात उचलताना दिसत आहे. या गोष्टीवरुन बिलालवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकेची झोड उठत आहे (Pakistani singer Bilal Saeed beating woman).

विशेष म्हणजे बिलाल ज्या लोकांसोबत हाणामारी करत आहेत त्यामध्ये त्याचा सख्खा भाऊ आणि भावजय आहे. व्हिडीओत बिलाल त्याच्या भावाला मारहाण करत आहे. यावेळी त्याची भावजय मध्ये आली. त्यावेळी बिलाल तिलाही लाथा मारतो. हे संतप्त दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर बिलालच्या चाहत्यांनी त्याच्यावर सडकून टीका केली (Pakistani singer Bilal Saeed beating woman).

सोशल मीडियावर बिलाल विरोधात #ShameonyouBilalSaeed असा ट्रेंड सुरु आहे. लोकांनी बिलालवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. एका महिलेवर हात उचलताना लाज वाटली नाही का? असे सवाल अनेकांनी केले आहेत. चारही बाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर अखेर बिलालने याप्रकरणावर आपली भूमिका मांडली. त्याने फेसबुकवर व्हिडीओ टाकत आपली भूमिका स्पष्ट केली.

मला महिलेचा सन्मान करणं आणि तिची सुरक्षा करणं दोघी गोष्टी चांगल्याप्रकारे जमतात. मी आपल्या सुरक्षेसाठी हात उचलला आहे, असं बिलाल फेसबुकवर म्हणाला आहे. त्याने फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडीओत घरातील वस्तूंची झालेली तोडफोड दाखवली. याशिवाय ही तोडफोड आपल्या भाऊ आणि भावजयने केल्याचा आरोप त्याने केला आहे.

बिलालने आपल्या भाऊ आणि भावजयवर ब्लॅकमेल करण्याचा गंभीर आरोप केला आहे. याशिवाय आपण कलाकार असल्याने या विषयी इतके दिवस मौन पाळलं होतं. मात्र आता डोक्यावरुन पाणी जात होतं. त्यामुळे अंस पाऊल उचलावं लागलं, असं बिलालने सांगितलं.

बिलालने ट्विटरवरदेखील आपली भूमिका मांडली आहे. प्रत्येक व्यक्तीला सन्माने जगण्याचा अधिकार आहे. मग ती स्त्री असो किंवा पुरुष. मला वारंवार त्रास दिला गेला. माझ्यासोबत गैरवर्तवणूक केली गेली. त्यामुळे मला असं पाऊल उचलावं लागलं, असं तो म्हणाला.

बिलाल सईद हा जितका पाकिस्तानात प्रसिद्ध आहे तितकाच भारतातही प्रसिद्ध आहे. त्याचे भारतातही अनेक चाहते आहेत. त्याचे अनेक पंजाबी गाणी लोकांच्या तोंडपाठ झाली आहेत. मात्र, या प्रकरणामुळे तो अनेक चाहत्यांच्या मनातून उतरला आहे.

हेही वाचा : Photo : ‘मालदीव डायरी’, सारा अली खानचं सुंदर फोटोशूट

Published On - 7:07 pm, Fri, 5 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI