Pakistan: या पाकिस्तानी टीक-टॉक स्टारची तऱ्हा बघा ! ‘भय्या आग लगे बस्ती में हम हमारी मस्ती में’ पण मस्ती नडली ना…

| Updated on: May 18, 2022 | 10:28 PM

या टिक टॉक स्टारचे नाव आहे हुमैरा असगर, हिने जळत्या जंगलातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या फोटोखालची तळटीप अधिक वेदनादायी आहे. त्यात लिहिले आहे की, मी जिथेही जाते तिथे आग लागते. त्यानंतर काही जणांनी ही आग हुमैरा हिनेच लावल्याचा आरोप केला आहे.

Pakistan: या पाकिस्तानी टीक-टॉक स्टारची तऱ्हा बघा ! भय्या आग लगे बस्ती में हम हमारी मस्ती में पण मस्ती नडली ना...
या पाकिस्तानी टीक-टॉक स्टारची तऱ्हा बघा !
Image Credit source: Twitter
Follow us on

इस्लामाबाद : पाकिस्तानात (Pakistan) सध्या उष्णतेची मोठी लाट आलेली आहे. काही ठिकाणी तर 51 डिग्री सेल्सिअस तापमानाची (Temperature) नोंद करण्यात येते आहे. याच कारणामुळे एबटाबादच्या जंगलातही सध्या भीषण आग लागली आहे. अशा गंभीर परिस्थितीत मदत करण्याऐवजी, एका टिक टॉक स्टारने जळत्या जंगलात व्हिडिओ शूट (Video Shoot) केला आहे. हा प्रकार पाकिस्तानात सार्वत्रिक टीकेचा विषय ठरलाय. या टिक टॉक स्टारला सध्या सोशल मीडियावर लोकांच्या संतापाचा सामना करावा लागतोय.

मी जिथेही जाते तिथे आग लागते

या टिक टॉक स्टारचे नाव आहे हुमैरा असगर, हिने जळत्या जंगलातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या फोटोखालची तळटीप अधिक वेदनादायी आहे. त्यात लिहिले आहे की, मी जिथेही जाते तिथे आग लागते. त्यानंतर काही जणांनी ही आग हुमैरा हिनेच लावल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात टीकेनंतर आता हुमैराकडून सारवासारवीचा प्रयत्न होताना दिसतो आहे. तिच्या मॅनेजरने ही आग शूटिंगसाठी लावण्यात आलेली नव्हती, असे स्पष्टीकरण दिले आहे. आणि अशा प्रकारचा व्हिडिओ करणे यात काहीही चूक नसल्याचेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

हा तर शुद्ध वेडेपणा, सोशल मीडियावर ट्रोलिंग

वाद वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर हा व्हिडीओ डिलिट करण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे इस्लामाबाद वन्यजीव व्यवसथापन बोर्डाच्या अध्यक्षा रीना सईद खान यांनीही हुमैरा यांच्यावर टीका केली आहे. रीना सईद म्हणाल्यात- आगीला ग्लॅमराईज करण्यापेक्षा ती विझवण्यासाठी एक बादली पाणी तिथे न्यायला हवे होते. काही जणांनी हा व्हिडीओ म्हणजे शुद्ध वेडेपणा असल्याची टीका केली आहे. एका यूझरने लिहिले आहे, या व्हिडिओतून ती किती भयंकर आहे हे समोर आले आहे. तर दुसऱ्या एका युझरने लिहीले आहे की, हुमैरा हिने केलेला हा व्हिडीओ मुर्खपणा आणि वेडेपणाची झलक दाखवणारा आहे. जागतिक तापमान रिस्क इंडेक्समध्ये पाकिस्तानचा क्रमांक आठवा म्हणजेत अत्यंत खालच्या पातळीवर आहे.

पाकिस्तानात सध्या प्रचंड उष्णतेची लाट

पाकिस्तानात गेल्या 61 वर्षांतील सर्व रेकॉर्ड तोडणारी उष्णतेची लाट सध्या आहे. अनेक शहरांत आणि ग्रामीण भागात तापमान ४८ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात येते आहे. सातत्याने वाढत चाललेल्या विजेच्या मागणीचा परिणाम वीज व्यवस्था कोलमडण्यात झाला आहे.