तब्बल 7 हजार हापूस आंब्यांचे दान, पाहा विठ्ठल रुक्मिणी मंदिराची डोळ्याचं पारणं फेडणारी सजावट

| Updated on: May 15, 2021 | 6:13 PM

पुण्याच्या एका भक्ताने अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणीला तब्बल 7 हजार हापूस आंबे अर्पण केले आहेत.

तब्बल 7 हजार हापूस आंब्यांचे दान, पाहा विठ्ठल रुक्मिणी मंदिराची डोळ्याचं पारणं फेडणारी सजावट
vitthal rukmini temple
Follow us on

सोलापूर : पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे महाराष्ट्रातील एक जागृत देवस्थान असल्याचं म्हटलं जातं. येथे संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात. विठ्ठल आणि रुक्मिणीच्या भक्तीपोटी येथे भाविक अनेक प्रकारचे दान करतात. सध्या पुण्याच्या एका भक्ताने अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणीला तब्बल 7 हजार हापूस आंबे अर्पण केले आहेत. या भाविकाची आणि त्याने केलेल्या या दानाची संपूर्ण भारतात चर्चा होत आहे. याच हापूस आंब्यांनी संपूर्ण विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजवण्यात आलंय. (Pandharpur Vitthal Rukmini temple decorated with 7 thousand mangoes)

सर्व सण साधेपणाने साजरे

सध्या कोरोना महासाथीची दुसरी लाट आली आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी सर्व धर्मियांच्या सर्व सणांना साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केंद्र तसेच राज्य सरकारने केले आहे. याच कारणामुळे मागील वर्षीपासून सगळे सण हे साध्या पद्धतीने साजरे केले जात आहेत. या वर्षी अक्षय्य तृतिया हा हिंदू धर्मातील सणसुद्धा साध्याच पद्धतीने साजरा केला गेला.

तब्बल 7 हजार हापूस आंबे अर्पण

मात्र, या वर्षीची अक्षय्य तृतीया आठवणीत राहावी म्हणून पुण्याचे व्यापारी विनायक काची (बुंदेला) यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीला तब्बल सात हजार हापूस आंबे चढवले आहेत. हे आंबे संपूर्ण मंदिर परिसरात विशिष्ट प्रकारे सजवण्यात आले आहेत. याच सजावटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गर्मीच्या काळामध्ये आंबा मोठ्या आवडीने खाल्ला जातो. थंडगार आंबा खाऊन अनेकजण उन्हापासून स्वत:चं संरक्षण करतात. याच गोष्टीमुळे तसेच सध्याच्या उन्हामुळे या पुण्याच्या व्यापाऱ्याने विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सात हजार हापूस आंब्यांचे दान केले आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला तब्बल 7 हजार आंबे दान करण्यात आले आहेत. या सर्व आंब्यांनी मंदिर सजवण्यात आलंय.

हापूस आंबा हा अतिशय प्रसिद्ध आंबा त्याला देश-विदेशातून मागणी आहे. विठ्ठर रुक्मिणी मंदिरात दरवर्षी अशाच प्रकारे हापूस आंबे दान केले जातात. 2020 साली तब्बल 3100 आंबे विठ्ठल आणि रुक्मिणीला दान करण्यात आले होते. या वर्षीचे हापूस आंब्यांची रत्नागिरीमधून आयात करण्यात आली होती. दरम्यान, सध्या कोरोनाची साथ सुरु असल्यामुळे देवाला अर्पण आलेले सर्व आंबे हे कोरोनाबाधित रुग्णांना देण्यात येतील, असे मंदिर प्रशासनाने जाहीर केले आहे.

इतर बातम्या :

Viral Video | छोट्याशा मुलीची मांजरीच्या पिलासाठी तळमळ, बोबडे बोल ऐकून नेटकरी म्हणतायत “ओ देखो म्याँऊ.. म्याँऊ कर रहे”

Viral Video : माणसांना लाजवेल असा कुत्र्याचा व्यायाम, अनेकांनी घेतली प्रेरणा, व्हिडीओ व्हायरल

Video | रागवलेल्या हत्तीने केळीची अख्खी बाग उद्ध्वस्त केली, फक्त एक झाड ठेवलं, कारण पाहाच

(Pandharpur Vitthal Rukmini temple decorated with 7 thousand mangoes)