AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिकन पाणीपुरी, मटण पाणीपुरी, कोळंबी पाणीपुरी…या दुकानाचं मेन्यू कार्ड व्हायरल!

आपल्या सर्वांच्या लाडक्या या स्ट्रीट फूडवर आता फ्युजनच्या नावाखाली अत्याचार केले जात आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक फोटो याचा पुरावा आहे. हे पाणीपुरीचं मेन्यू कार्ड आहे. हे पाहून तुम्हाला मळमळ होऊ शकते. लोकांचा विश्वास बसत नाही की कोणी अशा प्रकारे पाणीपुरी बनवू शकतं.

चिकन पाणीपुरी, मटण पाणीपुरी, कोळंबी पाणीपुरी...या दुकानाचं मेन्यू कार्ड व्हायरल!
panipuri menu card non vegImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 15, 2023 | 5:24 PM
Share

मुंबई: गोलगप्पा किंवा पाणीपुरी खायला कोणाला आवडत नाही? रस्त्याच्या कडेला पाणीपुरीची गाडी दिसताच लोकांच्या तोंडून पाणी येते. पण आपल्या सर्वांच्या लाडक्या या स्ट्रीट फूडवर आता फ्युजनच्या नावाखाली अत्याचार केले जात आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक फोटो याचा पुरावा आहे. हे पाणीपुरीचं मेन्यू कार्ड आहे. हे पाहून तुम्हाला मळमळ होऊ शकते. लोकांचा विश्वास बसत नाही की कोणी अशा प्रकारे पाणीपुरी बनवू शकतं.

एकेकाळी लोकांना आंबट-तिखट आणि गोड पाण्याची पाणीपुरी आवडायची. पण पश्चिम बंगालमधील स्ट्रीट फूड विक्रेते बराच पुढे गेल्याचे दिसते. इथे एक पाणीपुरीवाला भैय्या लोकांना चिकन-मटण गोलगप्पा खायला घालत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकसुद्धा ते आवडीने खात आहेत. या दुकानाच्या मेन्यूचा एक फोटो शेअर केला आहे, जो बंगालमधील एका दुकानातील असल्याचे सांगितले जात आहे. आता हा मेन्यू वाचून लोक हैराण झाले आहेत.

रितुपर्णा यांनी @MasalaBai हँडलवरून लिहिलं आहे की, बंगाल आणि तिथली जनता खूप पुढे गेली आहे असं वाटतं. मेन्यू नुसार इथल्या दुकानात चिकन आणि मटणा व्यतिरिक्त तुम्हाला कोळंबी पाणीपुरीही दिली जाणार आहे. याशिवाय गोलगप्प्याचे आणखी ही काही प्रकार आहेत.

एकाने लिहिले की, “अशी आश्चर्यकारक माणसे कुठून येतात? तर दुसरा म्हणतो, गोलगप्पांवर असा अत्याचार होऊ शकतो, असं मला वाटलंही नव्हतं. आणखी एका युजरने लिहिले की, ” हे बॉनलेस आहे का?”.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी