Video| ‘हा’ पोपट काढतो आयफोनच्या रिंगटोनचा हुबेहूब आवाज, नेटकरी म्हणतात फोनची रिंग वाजल्याचा भास होतो

पोपट (Parrot) हा एक बुद्धीमान पक्षी म्हणून ओळखला जातो. तुम्ही अनेक ठिकाणी बोलणारे पोपट देखील पाहिले असतील. जे पोपट हुबेहूब माणसांचा आवाज काढतात. पोपटासमोर तुम्ही एखादे वाक्य वारंवार जर बोललात तर तो पोपट देखील त्या वाक्याची नक्कल करतो. सध्या अशाच एका पोपटाचा व्हिडीओ व्हायरल (Parrot Viral Video) झाला आहे.

Video| हा पोपट काढतो आयफोनच्या रिंगटोनचा हुबेहूब आवाज, नेटकरी म्हणतात फोनची रिंग वाजल्याचा भास होतो
| Edited By: | Updated on: Jan 19, 2022 | 6:54 PM

पोपट (Parrot) हा एक बुद्धीमान पक्षी म्हणून ओळखला जातो. तुम्ही अनेक ठिकाणी बोलणारे पोपट देखील पाहिले असतील. जे पोपट हुबेहूब माणसांचा आवाज काढतात. पोपटासमोर तुम्ही एखादे वाक्य वारंवार जर बोललात तर तो पोपट देखील त्या वाक्याची नक्कल करतो. सध्या अशाच एका पोपटाचा व्हिडीओ व्हायरल (Parrot Viral Video) झाला आहे. व्हिडीमध्ये एक लाल रंगाचा पोपट दिसत आहे. जो पोपट हुबेहुब आय फोनच्या रिंगटोनचा ( iPhone) आवाज काढताना दिसत आहे. हा पोपट या आवाजाची एवढी हुबेहुब नक्कल करतो की, समोरच्या व्यक्तीला आयफोनची रिंगटोन वाजल्याचा भास होतो. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या पोपटाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असून, आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

लाखो लोकांनी पाहिला व्हिडीओ

आयफोनच्या रिंगटोनची हुबेहुब नक्कल करणाऱ्या या पोपटाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून या पोपटाच्या प्रेमातच पडले आहेत. तर अनेकांनी असा पोपट आपल्याला कुठे मिळेल अशी विचारणा देखील केली आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

लाईक्स, कमेंटचा पाऊस

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. नेटकऱ्यांकडून या पोपटाचे जोरदार कौतुक होत आहे. unilad नावाच्या एका युजरने हा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर  केला आहे. सोबतच त्याने या व्हिडीओसेबत एक कॅप्शन देखील दिले आहे. या कॅप्शनमध्ये त्याने असे म्हटले आहे की, या पोपटाचे नाव गुच्ची असून, तो आयफोनच्या रिंगटोनचा हुबेहुब आवाज काढतो.

संबंधित बातम्या

‘दिल दे दिया है, किडनी भी देंगें तुझे सनम!’ पण किडनी घेऊन बयेचा दुसऱ्यासोबतच छैय्या छैय्या

लग्नाची चर्चा तर होणारच ना भाऊ; कोरोना निर्बंधांमध्येही 450 लोक राहणार उपस्थित, जोडप्याने बनवला स्पेशल प्लॅन

चटणीशिवाय momo खाण्यास कुत्र्याचा नकार, व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणतात…