लग्नाची चर्चा तर होणारच ना भाऊ; कोरोना निर्बंधांमध्येही 450 लोक राहणार उपस्थित, जोडप्याने बनवला स्पेशल प्लॅन

लग्नाची चर्चा तर होणारच ना भाऊ; कोरोना निर्बंधांमध्येही 450 लोक राहणार उपस्थित, जोडप्याने बनवला स्पेशल प्लॅन
प्रातिनिधिक फोटो

कोरोनाचे नियम पाळून लग्न करणे हे मोठे आव्हान आहे. मात्र यावर एका जोडप्याने नामी उपाय शोधून काढला आहे. हे जोडपे आपले लग्न मोठ्या थाटात करणार आहे. तसेच त्यांच्या लग्नाला तब्बल 450 व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Jan 19, 2022 | 5:01 PM

देशावर गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे (corona) सावट आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका हा सर्वच व्यवसायांना बसला आहे. लोकांना घराच्या बाहेर पडता येणे शक्य होत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अनेक निर्बंध ( Corona Restrictions) घालण्यात आले आहेत. लग्न तसेच अंत्यसंस्काराला देखील मर्यादीत माणसांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचे नियम पाळून लग्न (Marriage)  करणे हे मोठे आव्हान आहे. मात्र यावर एका जोडप्याने नामी उपाय शोधून काढला आहे. हे जोडपे आपले लग्न मोठ्या थाटात करणार आहे. तसेच त्यांच्या लग्नाला तब्बल 450 व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. मात्र तरी देखील कोरोना नियमांचे कुठेही उल्लंघन होणार नाहीये, पाहुयात नेमक या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे कसे नियोजन केले आहे. तसेच 450 व्यक्ती उपस्थित असताना देखील कोरोना नियमांचे पालन करून कशापद्धतीने हे लग्न करण्यात येणार आहे.

24 जानेवारीला लग्न

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यात संदिपन सरकार आणि अदिती दास नावाचे जोडपे येत्या 24 जानेवारीला लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाला तब्बल 450 हुन अधिक जण उपस्थित राहणार आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की सध्या तर कोरोनाची तीसरी लाट पीक पॉईंटवर आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. लग्नासारख्या समारंभात उपस्थित राहणाऱ्या लोकांवर मर्यादा घालण्यात आली आहे. माग हा लग्नसोहळा एवढा थाटामाटात कसा होऊ शकतो? तर याचं उत्तर म्हणजे हा लग्न सोहळा जरा हटके पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. कसा ते आम्ही तुम्हाला सांगतो.

काय आहे प्लॅन

खरंतर या जोडप्याने यासाठी एक अनोखी योजना आखली आहे. या योजनेनुसार या समारंभात सहभागी होण्यासाठी Google Meet चा वापर करण्यात येणार आहे. गुगल मिटच्या माध्यमातून पाहुणे या लग्नात सहभागी होणार आहेत. एवढेच नाही तर जे पाहुणे या लग्नाला ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत, त्यांच्यासाठी जेवनाच्या मेजवाणीचा देखील बेत आहे. झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलेव्हरी कंपनीच्या माध्यमातून जेवण त्यांच्या घरी पोहचणार आहे. सध्या या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. अशा अगळ्यावेगळ्या पद्धतीने लग्नाचे आयोजन करण्यात आल्याने या जोडप्याच्या कल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या

रेल्वे रुळावर पडला युवक, चालकानं पाहिलं पण ट्रेन थांबवू शकला नाही आणि मग…

Viral Video : लग्नापूर्वी वराने जाहीरपणे मागितले असे काही, वधू लाजली आणि…

Viral : घातक चित्त्यानं केला कुत्र्यावर हल्ला, पण… नंतरचा Video पाहून थक्क व्हाल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें