BBC कार्यालयावर आयकर विभागाचे छापे, पब्लिक म्हणते, “व्हॅलेंटाईन डे निमित्त गिफ्ट”

आयकर विभागाचे अधिकारी BBC कार्यालयात काही सर्वेक्षण करत आहेत.  ट्विटरवर या कारवाईवर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. निवडक प्रतिक्रियांवर एक नजर टाकूया.

BBC कार्यालयावर आयकर विभागाचे छापे, पब्लिक म्हणते, व्हॅलेंटाईन डे निमित्त गिफ्ट
Memes on bbc
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 14, 2023 | 5:16 PM

गुजरात दंगलीवरील बीबीसीच्या डॉक्युमेंटरीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील BBC कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. हे कार्यालय पूर्णपणे सील करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले आहेत. कोणालाही बाहेर जाण्याची परवानगी नाही. दरम्यान, ट्विटरवरील लोक या कारवाईचा आनंद घेत आहेत. कुणी म्हणतंय ‘ए तो साला होना है’, तर कुणी म्हणतंय की यालाच खरं प्रेम म्हणतात… व्हॅलेंटाईन डेनिमित्त बीबीसीला भारताचं गिफ्ट.

मात्र आयकर विभागाच्या कारवाईबाबत कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाचे अधिकारी BBC कार्यालयात काही सर्वेक्षण करत आहेत.  ट्विटरवर या कारवाईवर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. निवडक प्रतिक्रियांवर एक नजर टाकूया.