Pranit More Controversy : डॉक्टर तरुणीचे 2 क्रिकेटपटूंसोबत अफेअर! ‘ते’ खासगी चॅट्स व्हयरल, मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरील वाद विकोपास

Doctor Sejal Pawar Controversial Comment : डॉक्टर तरुणी सेजल पवार हिचा दुसरा चेहरा समोर, दोन भारतीय क्रिकेटपटूंसोबत अफेअर, 'ते' खासगी चॅट्स समोर आल्यानंतर सर्वत्र उडाली खळबळ

Pranit More Controversy : डॉक्टर तरुणीचे 2 क्रिकेटपटूंसोबत अफेअर! ते खासगी चॅट्स व्हयरल, मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरील वाद विकोपास
| Updated on: Jun 12, 2026 | 11:58 AM

Doctor Sejal Pawar Controversial Comment : स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमध्ये मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवर नको ते वक्तव्य केल्यामुळे डॉक्टर सेजल पवार हिच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सांगायचं झालं तर, प्रणित मोरे याच्या शोमधील 370 रुपयांच्या बिर्याणीचा मुद्दा तापलेला असताना, डॉक्टर सेजल पवार हिच्या समोर आलेल्या व्हिडीओमुळे वाद अधिक चिघळला आहे… या व्हिडिओमध्ये डॉक्टर आणि इन्फ्लुएन्सर सेजल पवार (Doctor And Influencer Sejal Pawar) हिनं मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येतोय. एवढंच नाही तर, सेजल हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. काही खासगी चॅट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये सेजल हिचे दोन भारतीय क्रिकेटपटूंसोबत अफेअर असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे…

सांगायचं झालं तर, सध्या सेजल पवारशी संबंधित कथित चॅट्स आणि जुने स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दोन भारतीय क्रिकेटपटूंची नावे स्पष्ट दिसत आहेत. हे दोन भारतीय क्रिकेटपटू दुसरे तिसरी कोणी नाही तर, पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि आयुष बदोनी (Ayush Badoni) आहेत. रेडइटवर सेजलच्या फ्रेंड्सचे कथित चॅट्सचे स्क्रीनशॉट्स आणि ओडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत.

सेजल हिने पृथ्वी आणि आयुष यांनी डेट केलं आणि त्यानंतर दोघांना चिट केलं… असा दावा चॅटमध्ये करण्यात आला आहे… चॅटमध्ये असा उल्लेख करण्यात आलाय की, ‘सेजल हिने अनेक तरुणांची फसवणूक केली आहे… ती लोकांचा वापर टिश्यू पेपरसारखा करते…’ असं देखील चॅटमध्ये दिसत आहे. संबंधित प्रकरणी सेजल हिने माफी मागितली असली तर, वाद टोकाला पोहोचले आहे…

प्रणित मोरे याच्या शोमध्ये सेजल हिचे वक्तव्य

केईएम रुग्णालयातील डॉक्टर सेजल पवार हिने मेडिकल प्रॅक्टीसदरम्यानचा असा किस्सा सांगितला ज्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे… शवविच्छेदनावेळी अॅनाटॉमी लॅबमध्ये सेजल आणि तिची मैत्रिण मृतदेहाच्या गुप्तांगांच्या आकाराची तुलना करायची, असे डॉ. सेजल पवार हिने सांगितले. यावर प्रणित मोरे देखील हसला… हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. आता याप्रकरणी बीएनएस आणि आयटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow Us