Video: कॅब चालकासोबत प्रँक करणं तीन ब्लॉगरला चांगलंच महागात, तब्बल झाली एवढ्या वर्षांची शिक्षा!

रशियातील प्रसिद्ध प्रँकस्टर्स डमशिबे, तुसुपोव्ह आणि कॅसानोव्हा यांनी खाजगी कॅबने उबेर प्रमाणे प्रँक करण्याची योजना आखली. प्रँक असा होता की, ते ड्रायव्हरची कार घेऊन पळून जाणार होते, ज्यामुळे त्याला वाटेल की, त्याची कार चोरीला गेली आहे.

Video: कॅब चालकासोबत प्रँक करणं तीन ब्लॉगरला चांगलंच महागात, तब्बल झाली एवढ्या वर्षांची शिक्षा!
कार चोरीचा प्रँक करणं ब्लॉगर्सला महागात
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 5:25 PM

जेव्हा जेव्हा सोशल मीडियावर प्रँक व्हिडिओ अपलोड केला जातो, तेव्हा युजर्स तो मोठ्या आवडीने पाहतात. काही व्हिडीओ इतके गमतीशीर असतात की, ते पोस्ट होताच इंटरनेटच्या दुनियेत व्हायरल होतात. पण काही वेळा विनोदाच्या नावाखाली लोकांना त्रास देणाऱ्या, खोड्या करणाऱ्यांना त्याचे परिणामही भोगावे लागतात. अलीकडे टॅक्सी ड्रायव्हरसोबत प्रँक करणे, काही व्हिडिओ ब्लॉगर्सला चांगलंच महागात पडलं. टॅक्सी ड्रायव्हरचा प्रँक इतका महागात गेला की, या तरुणांना तुरुंगवास भोगावा लागला. हे प्रकरण 2021 चे आहे. पण आता या ब्लॉगर्सना शिक्षा झाली आहे. या प्रँकची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रशियातील प्रसिद्ध प्रँकस्टर्स डमशिबे, तुसुपोव्ह आणि कॅसानोव्हा यांनी खाजगी कॅबने उबेर प्रमाणे प्रँक करण्याची योजना आखली. प्रँक असा होता की, ते ड्रायव्हरची कार घेऊन पळून जाणार होते, ज्यामुळे त्याला वाटेल की, त्याची कार चोरीला गेली आहे. पण सगळा खेळ उलटला. या लोकांना असे काही घडेल असं वाटलंही नसेल, की ज्यासाठी त्यांना खूप पश्चाताप होईल. तिन्ही प्रँकस्टर्स प्रवासी म्हणून उभे होते आणि एका खाजगी कॅबमध्ये चढले. तेव्हा एकाने ड्रायव्हरला सामान कॅबिनमध्ये ठेवण्यास मदत करण्यास सांगितले. जेव्हा ड्रायव्हर सामान डिग्गीमध्ये ठेवायला जातो तेव्हा दुसरा खोडकर ड्रायव्हिंग सीटवर बसतो आणि गाडी घेऊन निघून जातो.

पाहा व्हिडीओ:

या खोड्या करणाऱ्यांनी विचार केला की, काही वेळाने ते त्याची कार ड्रायव्हरला परत करतील आणि सांगतील की हा एक प्रँक होता. मात्र त्यापूर्वीच चालकाने याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर प्रँक करणाऱ्या ब्लॉगर्सना कार चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. यामध्ये तिघेही दोषी आढळून आल्याने न्यायाधिशांनी त्यांना 3 वर्षे 6 महिने कारावासाची शिक्षा सुनावली.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी आपला निर्णय देताना सांगितले की, कॅब ड्रायव्हरसोबत केलेला हा विनोद कोणत्याही प्रकारे खोटा वाटत नाही. त्यामुळे ते दोषी मानून या तिन्ही ब्लॉगर्सना 3 वर्षे 6 महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. कॅसानोव्हा याआधीही वादात सापडले आहेत. मार्च 2020 च्या सुरुवातीला, त्याने चालत्या मेट्रोमध्ये आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचा प्रँक केला होता.

हेही पाहा:

Video: चिमुरड्या माकडाकडून वाहतं पाणी पकडण्याचा प्रयत्न, लोक म्हणाले, याचासारखा क्युट प्रसंग नाही!

Video: माकडाने आजोबांना केली अशी मदत, लोक पाहून म्हणाले, ‘माणसा परीस माकडं बरी!’