Video: चिमुरड्या माकडाकडून वाहतं पाणी पकडण्याचा प्रयत्न, लोक म्हणाले, याचासारखा क्युट प्रसंग नाही!

सध्या सोशल मीडियावर एका छोट्या माकडाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, जो लोकांना खूप आवडतो. या व्हिडिओमध्ये एक माकड हाताने पाणी पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

Video: चिमुरड्या माकडाकडून वाहतं पाणी पकडण्याचा प्रयत्न, लोक म्हणाले, याचासारखा क्युट प्रसंग नाही!
माकडाच्या पिल्लाचा व्हायरल होणारा व्हिडीओ,

सोशल मीडिया एक असे व्यासपीठ आहे, जिथं दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होतात. यामध्ये विविध प्रकारच्या प्राण्यांचे व्हिडिओ देखील आहेत, जे खूप मजेदार आहेत आणि लोकांचे मनोरंजन करतात. सध्या माकडांचे व्हिडिओही खूप व्हायरल होत आहेत. तुम्ही माकडे पाहिली असतील, किती उड्या मारतात. विशेषतः माकडांची पिलं, जी दिवसभर मस्ती करत असतात. ते दिसायला खूप गोंडस असतात, पण कधी कधी त्यांच्या मस्तीमुळे लोक नाराज होतात. तसं, माकडांना मानवाचे पूर्वज म्हणतात, त्यामुळेच अनेक गोष्टी ते माणसांसारख्याच करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना दरवेळी काहीतरी नवीन जाणून घ्यायचं असतं, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यातील माकडाच्या पिलाची कृती तुम्हाला खूप क्युट वाटेल.

सध्या सोशल मीडियावर एका छोट्या माकडाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, जो लोकांना खूप आवडतो. या व्हिडिओमध्ये एक माकड हाताने पाणी पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वॉश बेसिनच्या नळाजवळ एक लहान आणि गोंडस माकड बसले आहे, ज्यातून पाणी पडत आहे. या दरम्यान माकड आपल्या दोन्ही हातांनी ते पडणारे पाणी पकडण्याचा खूप प्रयत्न करते, पण त्याला काय माहीत की, आजपर्यंत कोणीही पाणी पकडू शकलेलं नाही, मग ते छोटे माकड कसे पकडू शकले?

व्हिडीओ पाहा:

माकडाचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना खूप पसंत पडत आहे. यावर लोक आपल्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘तो पाणी पकडण्याचा प्रयत्न करत आहे’. त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले आहे की, ‘त्याचा गोंधळलेला लूक भन्नाट आहे’.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर monkeyanduniverse या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या क्युट छोट्या व्हिडिओला लोकांना किती पसंती मिळत आहे, याचा अंदाज यावरून या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 75 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, माकडांचे असे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत, जे पाहून खूप आश्चर्य वाटते आणि हसूही येते.

Published On - 12:33 pm, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI