AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणी पोटफाडे, कोणी नाकतोडे, कोणी उघडे, तर कोणी नागडे… तुम्ही कोण?; अजब मराठी आडनावांचा चार्ट व्हायरल

महाराष्ट्रातील अनेक आडनावे विचित्र आणि मनोरंजक आहेत. काही आडनावे व्यवसाय, सवयी, किंवा शारीरिक वैशिष्ट्यांवरून पडली आहेत, तर काहींचा अर्थ अजूनही गूढ आहे. ही आडनावे फक्त नावे नाहीत, तर एका समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवतात.

कोणी पोटफाडे, कोणी नाकतोडे, कोणी उघडे, तर कोणी नागडे... तुम्ही कोण?; अजब मराठी आडनावांचा चार्ट व्हायरल
अजब आडनावं
| Updated on: Jan 08, 2025 | 2:57 PM
Share

नावात काय असतं? असं  शेक्सपिअर म्हणाला होता. समजा शेक्सपिअर महाराष्ट्रात आला असता तर त्याने असं विधान केलं असतं का? कारण महाराष्ट्रात तर नावातच बरंच काही असतं. इथे तर नावात-आडनावात जातही शोधली जाते. त्यामुळे नावात काय असतं? असं कसं म्हणून चालेलं बरं? ते जातीपातीचं जाऊ द्या. पण आपल्याकडची काही आडनावे तर भन्नाटच असतात. म्हणजे ही आडनावे इतकी विचित्र असतात की तुम्ही ती वाचताच पोट धरून धरून हसाल. इतकी इरसाल, विनोदी आणि थोडी हटके नावे आपल्याकडे आहेत. या नावांचा चार्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तुम्हीही वाचा आणि पोटधरून हसा.

महाराष्ट्रातील आडनावे अत्यंत विचित्र आहेत. वेगळी आहेत. त्यात गंमतही आहे आणि चिमटेही आहेत. बरीच मराठी आडनावे तऱ्हेवाईक आहे. तसे पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणची आडनावे तऱ्हेवाईक असतातच. पण मराठी नावे वाचताना मात्र गंमत वाटते. नावं वाचता वाचता तोंडावर अपसूक हसू फुटतं. त्याची गंमतही वाटते आणि काही आडनावे वाचून खेदही वाटतो. आडनावे पडण्यामागचं कारण म्हणजे त्यांचा व्यवसाय सांगितला जातो. व्यवसायानुसार ही आडनावे पडली आहेत. पण काही आडनावांमागचं लॉजिक काही कळत नाही. व्यवसायाशी संबंधित नसलेली आडनावेही आहेत. त्यामुळे ही आडनावे कशावरून पडली? असा प्रश्न मनात येतो.

आगलावे आणि फुकटे

काही आडनावे पक्षांच्या नावावरून पडलेली आहे. सांगायचंच झालं तर कावळे, गरूड, ससाणे वगैरे. तर काही आडनावे सवयी दर्शवतात. वरपे, हासे, खरे, खोटे, फुकटे, आगलावे आदी आडनावातून सवयी दर्शवल्या जातात. काही आडनावांतून धातूचा प्रकार अधोरेखित होतो. जसा की, लोखंडे, तांबे, हिरे वगैरे. काही आडनावे झाडांच्या प्रकारावरून घेतल्यात बरं का? पिंपळे, निमकर वगैरे.

कडू, गोड आणि रसाळही

काही आडनावे तर तुम्हाला चव सांगतील. गोडे, कडू, रसाळ आणि काहीबाही. फळाच्या प्रकारावरून आंबे, केळे, फणसे, जांभळे ही आडनावे तर फेमस आहेत. भाजीच्या प्रकारातील कांदे, कारले, पडवळ ही आडनावे माहीत नाहीत असा मनुष्य शोधून सापडणार नाही. काहींच्या आडनावातून धान्यांचा प्रकार समोर येतो. तांदळे, बाजरे, वाटाणे आणि फुटाणे. बरं काही आडनावे तर व्यंगाचे प्रकारही सांगून जातात. टकले, नकटे, तोतर, मानमोडे, नकटे वगैरे. रंग दाखवणारे आडनावे तर भारीच आहेत. काळे, गोरे आणि निळे यांच्यासोबत ढवळेही आहेत.

पादरे आणि पोटे

काही आडनावातून तर संपूर्ण शरीरशास्त्रच बाहेर पडतं. अवयवावरूनही आडनावे आहेत. डोके, पोटे, दाते, नाकतोडे, पोटफोडे वगैरे. काही आडनावातून प्राणी डोकावतात, वाघ, कोल्हे, वाघमारे, डुकरे, ढेकणे अशी कितीतरी. काही आडनावांमधून अश्लीलताही झिरपते,. नागडे, उघडे, पादरे… वाचायला विचित्र आहेत. पण ही आडनावं तुम्हीही कधी ना कधी ऐकली असणारच.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.