मोठी बातमी! शरद पवारांना जबर धक्का, दोन बड्या नेत्यांनी सोडली साथ, मोठा पक्षप्रवेश
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे, दोन बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आहे.

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला देखील वेग आल्याचं पहायला मिळत आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याचं पहायला मिळालं होतं, त्यानंतर आता महापालिका निवडणुकीपूर्वी देखील पक्षांतर सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात युतीची बोलणी सुरू आहेत, तर दुसरीकडे मात्र अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे, सोलापुरातून मोठी बातमी समोर आली आहे.
सोलापुरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 2 माजी महापौरांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. माजी महापौर यू एन बेरिया आणि माजी महापौर नलिनी चंदेले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. दोन माजी महापौरांसोबत इतरही काही नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
युतीची चर्चा
दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती होणार आहे, तर काही ठिकाणी अजित पवार गट देखील भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत युती करण्याची शक्यता आहे. मात्र ज्या ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजपसोबत युती होणार नाही, तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत अजित पवार गटाची युती होऊ शकते, चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप त्याबद्दल कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाहीये. तर मुंबईमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटानं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
