
Rakhi Sawant: टीव्ही आणि बॉलिवूडमधील ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. वैयक्तिक आयुष्य, लग्न, रिलेशनशिप्स आणि बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या राखीने यावेळी थेट बॉलिवूडच्या सर्वात प्रतिष्ठित बच्चन कुटुंबावर निशाणा साधला आहे. अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन यांच्याबद्दल राखीने केलेली वक्तव्ये सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
राखी सावंत अलीकडेच ‘फिल्मीज्ञान’ या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. या पॉडकास्टमध्ये तिला इंडस्ट्री, करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. याच दरम्यान राखीने अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन यांच्या खासगी आयुष्यावर उघडपणे भाष्य केलं. राखीच्या या वक्तव्यांनी अनेकांना धक्का दिला असून, तिच्या बेधडक शैलीमुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे.
अमिताभ-रेखा नात्यावर थेट टिप्पणी
राखी सावंतने थेट महानायक अमिताभ बच्चन यांच्या लव्ह लाइफवर टिप्पणी करत म्हटलं, ‘अमित जी, रेखा जींना आपलंसं करून घ्या. सध्या दोन-दोन बायका असण्याचा ट्रेंड चालू आहे. एकच आयुष्य आहे ते मनमुराद जगा. कधी-कधी मनात येतं, तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
इतक्यावरच न थांबता राखीने जया बच्चन यांच्यावरही थेट निशाणा साधला. ती म्हणाली, ‘अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांचीच निवड का केली, हे मला अजूनही कळत नाही. त्यांनी रेखा जींना का निवडलं नाही?’ याशिवाय राखीने जया बच्चन यांच्या फॅशन सेन्स आणि लूकवरही टोले लगावले. ‘जया बच्चन जी नीट सलवार-कमीजसुद्धा घालून फिरत नाहीत. इतक्या श्रीमंत आहेत. जया जी, तुम्ही मला तुमच्या वाढदिवसाच्या पार्टीला बोलवा, मी तुम्हाला एक छान सूट गिफ्ट देईन. केसांना कलर करा, थोडंसं बोटॉक्स करून घ्या. शेवटी तुमचे पती अमिताभ बच्चन आहेत’ असं ती म्हणाली.
‘मी रेखा जींनाच निवडेन’
राखी सावंतने आणखी एक वादग्रस्त विधान करत म्हटलं की, ‘जर कोणी मला जया जी आणि रेखा जी यांच्यातून एक निवडायला सांगितलं तर मी नक्कीच रेखा जींनाच निवडेन असं ती म्हणाली.