रुबाबदार लूक आणि फीचर्स, 2026 च्या सुरुवातीलाच या कारने वाढवलं Kia आणि Hyundai कंपनीचं टेंशन, किंमत….

2026 च्या सुरुवातीलाच भारतात एका नवीन कारची एन्ट्री. तिच्या फीचर्स आणि आकर्षक लुकने Kia आणि Hyundai कंपनी टेंशनमध्ये. किंमत किती?

| Updated on: Jan 31, 2026 | 4:49 PM
1 / 8
26 जानेवारी 2026 रोजी चेन्नई येथे रेनो (Renault) इंडियाने आपल्या प्रतिष्ठित एसयूव्ही ‘डस्टर’चा नवा अवतार सादर करत भारतीय ऑटोमोबाईल बाजारात मोठी खळबळ उडवून दिली.

2 / 8
चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित भव्य कार्यक्रमात ‘गँग ऑफ डस्टर्स’ या समुदायासह 15,000 हून अधिक ऑटोप्रेमी उपस्थित होते.

3 / 8
नव्या डस्टरने आपली जुनी रफ-अँड-टफ ओळख कायम ठेवत आधुनिक भारतीय ग्राहकांच्या गरजांनुसार स्वतःला पूर्णपणे नव्याने सादर केले आहे.

4 / 8
कंपनीच्या दाव्यानुसार, नवी डस्टरला 5-स्टार सुरक्षा देण्यात आली असून प्रवाशांना सर्वोच्च सुरक्षेचा अनुभव देण्यावर भर देण्यात आली आहे. इंजिन विभागात रेनोने यावेळी मोठे बदल केले आहेत.

5 / 8
नव्या डस्टरमध्ये TCe 160 आणि TCe 100 असे दोन टर्बो पेट्रोल इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. याशिवाय, भारतात प्रथमच E-Tech 160 स्ट्रॉंग हायब्रिड इंजिन सादर करण्यात आले आहे. हे 1.8 लिटर इंजिन आणि 1.4 kWh बॅटरीसह येते.

6 / 8
विशेष म्हणजे, शहरातील ड्रायव्हिंगदरम्यान ही एसयूव्ही 80 टक्क्यांपर्यंत इलेक्ट्रिक मोडमध्ये (EV मोड) चालू शकते. ज्यामुळे ती आपल्या सेगमेंटमधील सर्वात कार्यक्षम कारपैकी एक ठरते.

7 / 8
Google आणि AI सह स्मार्ट फीचर्स हे कारमध्ये देण्यात आले आहेत. ‘रेनो फॉरएवर’ अंतर्गत 7 वर्षांची वारंटी देखील देण्यात आली आहे.

8 / 8
नव्या रेनो डस्टरची प्री-बुकिंग ‘R Pass’च्या माध्यमातून 21,000 रुपयांमध्ये सुरू करण्यात आली आहे. कारच्या अधिकृत किंमती मार्च 2026 च्या मध्यात जाहीर केल्या जाणार आहेत.