Richa Chadha: रिचाने एक ट्विट केलं; लोकांनी तिचा बुद्ध्यांक काढला; आयात-निर्यातीचा मुद्यावरुन रिचा झाली ट्रोल

या ट्विटवर अनेक विनोदी मीम्स शेअर करून तिला अनेक प्रश्नही उपस्थित करत आहेत. तिच्या या ट्विटवर अनेकांनी तिला तुम्हाला आयात आणि निर्यात यामधील फरक माहित नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे. रिचा चढ्ढाला तिची चूक लक्षात येताच तिने ट्विट डिलीट केले आहे. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

Richa Chadha: रिचाने एक ट्विट केलं; लोकांनी तिचा बुद्ध्यांक काढला; आयात-निर्यातीचा मुद्यावरुन रिचा झाली ट्रोल
आयात निर्यातीच्या ट्विटमुळे रिचा चढ्ढा ट्रोल
महादेव कांबळे

|

Jun 16, 2022 | 7:37 PM

मुंबईः जगभरात सध्या सुरू असलेल्या गव्हाच्या संकटाच्या (Wheat crisis) पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीकडून (United Arab Emirates)(UAE) बुधवारी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या पुढील चार महिने भारतातून खरेदी केलेला गहू इतर कोणत्याही देशात निर्यात करण्यात येणार नाही. UAE च्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हे निर्बंध भारतीय गहू आणि त्याच्या सर्व प्रकारांपासून बनवलेल्या पिठावर लागू करण्यात येणार आहे. मात्र एका वृत्तवाहिनीकडून या बातमीचे हिंदी आणि इंग्रजीत चुकीचे भाषांतर करण्यात आले होते. त्यामध्ये आयात आणि निर्यात यातील फरक समजून न घेता, अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने ट्विट केले आणि लिहिले होते की,’welcome to the international economic impact of hate’ असं तिने ट्विट करताच अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha) प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे.

 

अनेक विनोदी मीम्स शेअर

तिच्या या ट्विटवर अनेक विनोदी मीम्स शेअर करून तिला अनेक प्रश्नही उपस्थित करत आहेत. तिच्या या ट्विटवर अनेकांनी तिला तुम्हाला आयात आणि निर्यात यामधील फरक माहित नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे. रिचा चढ्ढाला तिची चूक लक्षात येताच तिने ट्विट डिलीट केले आहे. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

रिचाच्या IQ वरच प्रश्नचिन्ह

रिचा चढ्ढाच्या त्या ट्विटवर लोकांनी प्रचंड प्रतिसाद देत #RichaChadha हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला. या तिच्या ट्विटमुळे लोकांनी थेट तिच्या बुद्धांकावरच शंका घेतली आहे. त्यामुळे लोकंही तिची आणि राहुल गांधी यांची तुलना करु लागले आहेत. @abdullah_0mar या युजरने ट्विटरवरून लिहिले आहे की, ‘हा ऋचा चड्ढाचा IQ आहे. IQ च्या बाबतीत ती राहुल गांधींबरोबर टक्कर देऊ शकते.’

 

त्याचवेळी @Kadak_chai_2 नावाच्या युजरने या अभिनेत्रीला मजेदार मीम्स तयार करुन त्याने विचारले आहे की, ‘दोन वेगळे काय आहेत? तर’ @VRspeaking हँडलवरून एका युजरने लिहिले आहे, ‘या महिलेला निर्यात आणि आयात यातील फरक कळत नाही पण हिला मात्र अर्थव्यवस्थेबद्दल बोलायचे आहे.’ असे असंख्य मीम्स तयार करुन रिचा चढ्ढाला ट्रोल केले जात आहे.

 


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें