
Asia’s Richest Village Madhapar : जेव्हा श्रीमंतांची गोष्ट समोर येथे तेव्हा साहाजिकच शहरांचा उल्लेख होतो. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता, बेंगळुरू, पुणे येथे कोट्याधीशच नाही तर अब्जाधीश राहतात. पण एखादे छोटे खेडेगाव श्रीमंत आहे, असे तुम्ही कधी ऐकले आहे का? पण देशात असे एक गाव आहे जे मेट्रो शहराला श्रीमंतीत टक्कर देते. या गावात विविध 17 बँकांच्या शाखा आहेत. या शाखांमध्ये 7000 कोटींच्या ठेवी आहेत. या गावात पक्की घरं, स्वच्छ आणि सुंदर रस्ते आहेत. गुजरातमधील भुज जिल्ह्यात हे गाव वसलेले आहे. या गावाचे नाव माधापार असे आहे. या गावात इतरही अनेक सोयी-सुविधा आहे. शहराला लाजवेल असे हे गाव आहे.
माधापार कसे ठरले आशियातील श्रीमंत गाव
माधापार हे गाव असले तरी या गावातील लोकांनी गुंतवणुकीचा आणि विकासाचा ध्यास घेतला. या गावाची सर्वात मोठी ताकद, शक्ती म्हणजे अनिवासी भारतीय नागरिक. या गावातील अनेक तरुण आज इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, युरोप आणि आफ्रिका खंडातील देशात नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत. पण त्यांनी गावाला कधी अंतर दिले नाही. या NRI ने माधापार येथील बँकांमध्ये कोट्यवधींच्या ठेवी ठेवल्या आहेत.
गावात सर्व सोयी-सुविधा
गुजरातमधील माधापार या गावात विविध बँकांच्या 17 शाखा आहेत. या गावात पक्के रस्ते आहेत. आधुनिक डिजिटल शाळा, मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आणि ब्रॉडबँड, 5 जी नेटवर्क आणि इतर अनेक सोयी-सुविधा आहे.
माधापार गावात सर्व -सुविधा आल्या असल्या तरी परंपरा, संस्कृती त्यांनी सोडलेली नाही. या गावात सर्व उत्सव, सण एकत्र येत उत्साहात साजरे करण्यात येतात. तुम्ही जर गुजरात राज्यात पर्यटनासाठी जाणार असला तर या गावाला जरूर भेट द्या. या गावात आधुनिक जीवनशैली आणि परंपरेचा सुरेख मिलाफ दिसून येतो.