त्याने खरेदी केला महिलेचा ‘आत्मा’, बदल्यात दिले ३३ कोटी रुपये, आता समजेना काय करायचे!

रशियात हैराण करणारा प्रकार घडला आहे. ज्यास स्थानिक मीडियापासून सोशल मीडियाने सर्वांचे लक्ष ओढले आहे. एका महिलेने कथित रुपाने स्वत:ची 'आत्मा' विकून ४ मिलियन डॉलर ( सुमारे ३३ कोटी रुपये ) मिळवले आहेत.

त्याने खरेदी केला महिलेचा आत्मा, बदल्यात दिले ३३ कोटी रुपये, आता समजेना काय करायचे!
| Updated on: Sep 17, 2025 | 8:22 PM

तुम्ही एक म्हण नक्की ऐकली असेल की पैशाने तुम्ही काहीही खरेदी करु शकता, परंतू एखाद्याचा आत्मा आणि मन खरेदी करु शकत नाही. परंतू ही म्हण आता खोटी ठरणार आहे. कारण एका व्यक्तीने तब्बल ४ दशलक्ष डॉलर ( सुमारे ३३ कोटी रुपये ) मोजून तरुणीचा आत्मा खेरदी केला. हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल. परंतू या बातमीने स्थानिक प्रसारमाध्यमांपासून ते सोशल मीडियावर हंगामा माजला आहे.आता या आत्म्याचे नेमके करायचे काय असा त्याला प्रश्न पडला आहे.

डेली स्टारच्या बातमीनुसार रशियात एक हैराण करणारा प्रकार घडला आहे. ज्यामुळे स्थानिक मीडियात याची चर्चा सुरु आहे. एका महिने कथितपणे तिचा ‘आत्मा’ विकून ४ दशलक्ष डॉलर ( सुमारे ३३ कोटी रुपये ) मिळवले आहेत. या रकमेतून तिने खेळण्याचे कनेक्शन आणि कॉन्सर्ट तिकीट खरेदी केले. बातमीनुसार रशियाच्या सोशल नेटवर्कींग प्लॅटफॉर्म Vkontakte वर एक व्यक्ती दिमित्री (Dmitri) यांनी मजेने एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी लिहीले होते की त्यांना आत्मा विकत घ्यायचा आहे. सुरुवातीला लोकांनी यास मस्करीत घेतले. परंतू लवकरच ही गोष्ट सत्य सिद्ध झाली.

तरुणीने या पैशातून लाबूबू डॉलचे कलेक्शन खरेदी केले

करीना नावाच्या या तरुणीने या ऑफरला स्वीकारले. हैराण करणारी ही बाब होती की दोघांमध्ये रक्ताने लिहिलेला करार झाला. काही दिवसांनी दिमित्री यांनी यासंदर्भातील रक्ताने लिहिलेला करार सोशल मीडियावर पोस्ट केला. आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी आता पहिली आत्मा खरेदी केली आहे. हा करार रक्ताने साईन केला आहे. मला असे वाटत आहे की मी ‘डेव्ही जोन्स’ आहे. करीना हीने स्थानिया मीडियाला सांगितले की मी आत्मा विकल्याचा मला काहीही पश्चाताप नाही. मला लोकांच्या टीकेची पर्वा नाही. करीनाने सांगितले की रक्कम थेट तिच्या बँक अकाऊंटला गेली आणि त्यानंतर करीनाने Labubu बाहुल्यांचे कलेक्शन खरेदी केले.तसेच प्रसिद्ध गायिका नादेज़्दा काडिशेवा यांच्या कॉन्सर्टचे तिकीट खरेदी केले.

आता समजत नाही काय करु

दुसरीकडे दिमित्री यांनी म्हणणे आहे त्यांनी मजेत ही ऑफर दिली होती. मला आशा नव्हती एखादी महिला खरंच ही ऑफर स्वीकारेल. आता मला स्वत:ला कळत नाहीए खरेदी केलेल्या आत्म्याचे काय करायचे ? ही घटना एखाद्या हॉरर चित्रपटाच्या पटकथेसारखी वाटते. सोशल मीडियावर अनेक लोकांनी यास सैतानी प्रवृतीशी जोडून टीका केली आहे. तर काहींनी यास संपूर्णपणे पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे.