Video | रशियन तरुण-तरुणींचा जबरदस्त भांगडा, धमाकेदार डान्स एकदा पाहाच !

या व्हिडीओमध्ये रशियन तरुण आणि तरुणींनी चक्क भांगडा सादर केला आहे. धडाकेबाज भांगड्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Video | रशियन तरुण-तरुणींचा जबरदस्त भांगडा, धमाकेदार डान्स एकदा पाहाच !
punjabi bhangra viral video
| Edited By: | Updated on: Jul 07, 2021 | 3:46 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ प्राणी आणि पक्षी तर काही व्हिडीओ हे लोकांनी केलेल्या कलाकारीचे असतात. सध्या रशियन लोकांच्या अशाच एका कलाकारीचा जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रशियन तरुण आणि तरुणींनी चक्क भांगडा सादर केला आहे. धडाकेबाज भांगड्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Russian people dancing on Punjabi Bhangra video went viral on social media)

रशियन लोकांचा एक मजेदार व्हिडीओ

भारतीय लोकांची संपूर्ण जगात एक वेगळीच ओळख आहे. भारताची संस्कृती, येथील राहणीमान विदेशी लोकांना चांगलेच आवडत आले आहे. याच पार्श्वभूमीवर रशियन लोकांचा एक मजेदार व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रशियन तरुण आणि तरुणी पंजाबी गाण्यावर भांगडा नृत्यप्रकार सादर करताना दिसत आहेत.

‘मुंडिया तू बचके रही’ गाण्यावर जबरदस्त भांगडा

या व्हिडीओमध्ये काही तरुण तसेच तरुणींनी भारतीय वेश परिधान केला आहे. या नृत्यामध्ये तरुण आणि तरुणी असे दोन गट पडलेले दिसत आहेत. हे दोन्ही गट एकमेकांमध्ये मिसळत ‘मुंडिया तू बचके रही’ या पंजाबी गाण्यावर डान्स करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या गाण्यात रशियन तरुणींनी घेतलेले ठुमके तसेच गाण्याच्या तालावर धरलेला ठेका नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. नेटकरी हा डान्स पाहून भारावून गेले असून या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे.

इतर बातम्या :

Video | भर मंडपात एकमेकांना इशारे, नवरदेव-महिलेचा व्हिडीओ व्हायरल

Video | ओव्हरलोडेड ट्रकचा भीषण अपघात, धड झाले वेगळे, चाक लागले रस्त्यावर पळायला, व्हिडीओ व्हायरल

Video | Swiggy फूड डिलिव्हरी बॉयचे जबरदस्त स्केटिंग, जेवण पोहोचवण्यासाठी मोठी कसरत, व्हिडीओ एकदा पाहाच

(Russian people dancing on Punjabi Bhangra video went viral on social media)