Video | भर मंडपात एकमेकांना इशारे, नवरदेव-महिलेचा व्हिडीओ व्हायरल

सध्या असाच एक अतिशय़ मजेदार आणि हसायला लावणारा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये भर मंडपात नरदेवाला एका महिलेने मजेदार इशारा केला आहे.

Video | भर मंडपात एकमेकांना इशारे, नवरदेव-महिलेचा व्हिडीओ व्हायरल
groom-funny viral video
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 4:33 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओंमध्ये नवरी-नवरदेव यांची उडालेली फजिती मोठ्या गमतीने दाखवलेली असते. म्हणूनच की काय लग्न समारंभातील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सध्या असाच एक अतिशय़ मजेदार आणि हसायला लावणारा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भर मंडपात नरदेवाला एका महिलेने मजेदार इशारा केला आहे. (women weird sign to groom video went viral on social media)

नवरदेवापासून काही अंतरावर एक महिला बसली

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लग्न सोहळा पार पडताना दिसतोय. या लग्न समारंभामध्ये लोक मोठ्या प्रमाणात जमा झाले आहेत. या लग्न सोहळ्यातील वराचे नाव विजय तर वधूचे मयुरी असे असून लग्नविधी पार पडतो आहे. याच वेळी स्टेजवर नवरी तसेच नवरदेवापासून काही अंतरावर एक महिला बसली आहे.

नरवेदाला महिलेकडून इशारे

समोर बसलेल्या महिलेने निळी साडी नेसलेली असून तिने अतिशय मनमोहक साज चढवला आहे. समोर बसलेल्या नवरदेवाला ती इशारे करत आहे. ती करत असलेल्या इशाऱ्यांवरुन अजूनही वेळ आहे पळून जा असे ती नवरदेवाला सांगत असावी, असा अंदाज लावला जातोय. लग्नाची भानगड गळ्यात मारून घेऊ नकोस असेही कदाचित ही महिला नवरदेवाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे. यावेळी नवरदेवानेसुद्धा या महिलेला अतिशय मजेदार उत्तर दिले आहे. त्याने हात झटकत जे होईल ते पाहून घेऊयात. सध्यातरी लग्न करतोय, असे या महिलेला सांगितले असावे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, भर मंडापतील हा इशाऱ्यांचा खेळ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. लोक हा व्हिडीओ पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत. तसेच या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, Durga Prasad Mohapatra या फेसबुक युजरने हा व्हिडीओ त्याच्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video | ओव्हरलोडेड ट्रकचा भीषण अपघात, धड झाले वेगळे, चाक लागले रस्त्यावर पळायला, व्हिडीओ व्हायरल

Video | Swiggy फूड डिलिव्हरी बॉयचे जबरदस्त स्केटिंग, जेवण पोहोचवण्यासाठी मोठी कसरत, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | भर मंडपात आई खवळली, थेट नवरदेवालाच चपलेने झोडपले, व्हिडीओ व्हायरल

(women weird sign to groom video went viral on social media)

Non Stop LIVE Update
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक.
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?.
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?.
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.