Video | ना लाल माती, ना फड, पण लहानग्यांची कुस्ती जबरदस्त, मजेदार व्हिडीओ व्हायरल

लहान मुलांनी काढलेल्या खोड्या, त्यांचा लडीवाळपणा नेटकऱ्यांना चांगलाच आवडतो. सध्या मात्र वेगळा व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये दोन छोटी मुलं चक्क कुस्ती खेळत आहेत. खुल्या मैदानातील त्यांची कुस्ती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Video | ना लाल माती, ना फड, पण लहानग्यांची कुस्ती जबरदस्त, मजेदार व्हिडीओ व्हायरल
WRESTLING VIDEO
| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 10:58 PM

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. या मंचावर रोजच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. छोट्या मुलांचे व्हिडीओ तर चांगलाच चर्चेचा विषय ठरतात. लहान मुलांनी काढलेल्या खोड्या, त्यांचा लडीवाळपणा नेटकऱ्यांना जाम आवडतो. सध्या मात्र वेगळा व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये दोन छोटी मुलं चक्क कुस्ती खेळत आहेत. खुल्या मैदानातील त्यांची कुस्ती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

मुलांमध्ये रंगला कुस्तीचा सामना 

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या व्हिडीओमध्ये दोन छोटी मुलं कुस्ती खेळताना दिसत आहेत. ही मुलं एकमेकांना खाली पडत आहेत. कुस्तीचे मैदान नसले तरी ही छोटी मुलं रस्त्यावरच मजेत एकमेकांना जमिनीवर पाडत आहेत. त्यांच्यामध्ये चढाओढ लागली आहे. हा व्हिडीओ चांगलाच मजेदार असून दोन मुलं आनंदात कुस्ती खेळताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक छोटा पळ काढताना दिसत आहे. मात्र दुसरा छोटा मुलगा पळून जात असलेल्या लहानग्याच्या मागे लागला आहे. तो पळून जात असलेल्या मुलाला माझ्यासोबत कुस्ती खेळ असे म्हणत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. तसेच काही नेटऱ्यांनी या व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया दिल्या असून त्याला लाईकसुद्धा केले आहे. सध्या हा व्हिडीओ तुम्हाला ट्विटरवर पाहता येईल.

इतर बातम्या :

Video | याला फटाका म्हणावं की मिसाईल ! पेटवून देताच थेट आकाशात झेपावला

जिच्यावर जिवापाड प्रेम केलं, तिचा अपघात, कोमात असताना विवाह, ब्रिटनमधली अनोखी प्रेमकहाणी

Video: टाच मारली आणि बी पेरलं, शेतात अनोख्या पद्धतीने पेरणी करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल

(small children playing wrestling on road funny video went viral on social media)