AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिच्यावर जिवापाड प्रेम केलं, तिचा अपघात, कोमात असताना विवाह, ब्रिटनमधली अनोखी प्रेमकहाणी

अपघातानंतर पीडित तरुणीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता, त्या व्यक्तीने डॉक्टरांची विनवणी करून तिथेच तिच्याशी लग्न केले. त्याला आपल्या मैत्रिणीला पत्नीच्या रुपात बघायचे होतं.

जिच्यावर जिवापाड प्रेम केलं, तिचा अपघात, कोमात असताना विवाह, ब्रिटनमधली अनोखी प्रेमकहाणी
ग्रेग पीटर आणि एण्णा लेगरचा आधीचा फोटो
| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 5:54 PM
Share

ब्रिटनमध्ये एका व्यक्तीच्या गर्लफ्रेंडचा कार अपघातात मृत्यू झाला. त्या व्यक्तीने आपल्या मैत्रिणीशी लग्न करण्याचे वचन दिले होते. पण त्याआधी ती मुलगी एका वेदनादायक अपघाताची शिकार झाली. अपघातानंतर पीडित तरुणीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता, त्या व्यक्तीने डॉक्टरांची विनवणी करून तिथेच तिच्याशी लग्न केले. त्याला आपल्या मैत्रिणीला पत्नीच्या रुपात बघायचे होतं. (boyfriend married to girlfriend before she died in hospital couple got married in icu last promise complete)

‘द सन यूके’ च्या अहवालानुसार, 34 वर्षीय जिम व्यवस्थापक ग्रेग पीटर्स आणि 28 वर्षीय एण्णा लेडगर एकमेकांच्या खूप प्रेमात होते. दोघे फक्त 18 महिन्यांपूर्वी भेटले, परंतु एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. ते लग्नाचे नियोजन करत होते. दोघांच्या कुटुंबीयांनीही सहमती दर्शवली. पण एका अपघाताने सगळंच बदलून गेलं.

कार अपघातानंतर मैत्रीण रुग्णालयात पोहोचली

एक दिवस नोकरीवरून येत असताना अण्णा लेगरची कार दुसऱ्या वाहनाला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की एण्णांच्या अंगावर अनेक गंभीर जखमा झाल्या होत्या. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे बॉयफ्रेंड ग्रेग पीटर्ससह कुटुंबही उपस्थित होते. प्रत्येकजण तिच्या कल्याणासाठी प्रार्थना करत होतं.

डॉक्टरांनी सांगितले की, एण्णाला आयसीयूमध्ये हलवावे लागेल, तिची प्रकृती खालावत होती. एण्णा कोमात गेली हे कळाल्यानंतर ग्रेग खूप अस्वस्थ झाला, त्याला एण्णांला गमवायचं नव्हतं. ग्रेगला तिला पत्नी म्हणून बघायचं होतं. जेणेकरून एण्णा पत्नीच्या रूपात त्यांच्या आठवणींमध्ये कैद राहिल.

ICU मध्ये लग्न!

ग्रेगने डॉक्टरांकडे विनवणी केली, पण त्यांनी नकार दिला. शेवटी, ग्रेगचे प्रेम आणि मनःस्थिती पाहून त्यांनी सहमती दिली. एण्णा आणि त्याच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत, ग्रेगने आपल्या मैत्रिणीला अंगठी घालून तिला आपली पत्नी बनवलं. काही काळानंतर एण्णांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या संमतीने तिचे काही अवयव दान करण्यात आले. ज्यातून 6 लोकांना नवीन जीवन मिळाले.

हेही वाचा:

Video: ती ट्रेन चालवत स्टेशनपर्यंत पोहचली, तो ट्रेनसमोरच फुलांचा गुलदस्ता घेऊन उभा राहिला, अनोख्या प्रपोजचा व्हिडीओ व्हायरल

Video: एका शूजसाठी वऱ्हाडी भिडले, एकमेकांच्या अंगावर पडले, बूट चोरीच्या प्रसंगात मांडवभर वऱ्हाड्यांचं तांडव

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.