Video | याला फटाका म्हणावं की मिसाईल ! पेटवून देताच थेट आकाशात झेपावला

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अगदीच विशेष आहे. कारण या व्हिडीओमध्ये एक गोलाकार फटाका थेट आकाशात उंच जाताना दिसतोय. साधारणत: फटाके जास्तीत जास्त 50 ते 60 फुट उंच जातात. मात्र व्हिडीओतील फटाका थेट आकाशात झेपावला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

Video | याला फटाका म्हणावं की मिसाईल ! पेटवून देताच थेट आकाशात झेपावला
viral video


मुंबई : सोशल मीडियावर रोजच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात, तर काही व्हिडीओंना पाहून आपण थक्क होऊन जातो. सध्या एक अजब गजब व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ जुना असला तरी नेटकरी त्याला आवडीने पाहत आहेत. या व्हिडीओमध्ये एक फटाका पेटवल्यानंतर तो थेट आकाशात झेपावल्याचं दिसतंय

हवेत उंच जाणारा फटाका

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अगदीच विशेष आहे. कारण या व्हिडीओमध्ये एक गोलाकार फटाका थेट आकाशात उंच जाताना दिसतोय. साधारणत: फटाके जास्तीत जास्त 50 ते 60 फुट उंच जातात. मात्र व्हिडीओतील फटाका थेट आकाशात झेपावला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. एवढ्या उंच जाणारा हा फटाका नेमका कसा आणि कोणी तयार केला असेल असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक फटाका पेटवताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये काही क्षणात आगीचा मोठा भडका उडाल्याचे दिसतेय. त्यानंतर धुरामधून एक वर्तुळाराकार आकृती हवेत झेपावली आहे. ही आकृती आगदी गोल गोल फिरत आकाशात वर जाताना दिसतेय. हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांना ही एखादी मिसाईल तर नाही ना ? असा प्रश्न पडला आहे. फटाका आकाशात झेपावतानाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. विशेष म्हणजे खाली आल्यानंतर या गोलाकार आकृतीमधून एक छोटोसे पॅराशूट उघडले गेले आहे. पॅराशूटच्या मदतीने गोलाकार आकृती नंतर खाली येताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. तसेच हा व्हिडीओ जुना आहे. मात्र तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स मजेदार आहेत. सध्या हा व्हिडीओ यूट्यूबवर पाहता येईल.

इतर बातम्या :

वानखेडेंची नोकरी जातेय की मलिक यांचे मंत्रिपद जातंय ते पाहुया; रामदास आठवलेंचा खोचक टोला

Video: भारत-पाकिस्तान मॅचआधी मौका-मौकाची जाहिरात, भारतीय नेटकऱ्यांकडून व्हिडीओ व्हायरल

जिच्यावर जिवापाड प्रेम केलं, तिचा अपघात, कोमात असताना विवाह, ब्रिटनमधली अनोखी प्रेमकहाणी

(funny firecracker went into air video went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI