AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वानखेडेंची नोकरी जातेय की मलिक यांचे मंत्रिपद जातंय ते पाहुया; रामदास आठवलेंचा खोचक टोला

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची एक वर्षात नोकरी घालवणार असं विधान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं होतं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. (ramdas athawale reaction on nawab malik statement on sameer wankhede)

वानखेडेंची नोकरी जातेय की मलिक यांचे मंत्रिपद जातंय ते पाहुया; रामदास आठवलेंचा खोचक टोला
ramdas athawale
| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 7:05 PM
Share

सातारा: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची एक वर्षात नोकरी घालवणार असं विधान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं होतं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. वानखेडेंची नोकरी जाते की नवाब मलिक यांचं मंत्रिपद जातं हे पाहुया, असा खोचक टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे.

रामदास आठवले आज कराड दौऱ्यावर होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना आठवले यांनी हे विधान केलं. वानखेडेंची नोकरी जातेय की मलिक यांचे मंत्रीपद जातंय ते पाहुया, असं आठवले यावेळी म्हणाले. आर्यन खान प्रकरणात पक्षपातीपणा केला जातोय असं म्हणता येणार नाही. आरोप होतायंत मात्र पूर्ण चौकशी केल्यानंतर आर्यन खानसह इतरांना ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने आर्यन खानचा जामीन फेटाळला आहे. याचा अर्थ असा की त्याच्या विरोधात NCB कडे सबळ पुरावा आहे. त्यामुळे आरोप करणे योग्य नाही. सुशांत सिंग प्रकरणानंतर फिल्म इंडट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा होतोय हे सिध्द झाले आहे. त्यामुळे पक्षपातीपणा केला जातोय असं म्हणणे योग्य ठरणार नाही. जी माहिती मिळतेय त्याप्रमाणे कारवाई केली जातेय, असंही ते म्हणाले.

मनसेशी युती केल्यास भाजपची सत्ता येणार नाही

यावेळी त्यांनी मनसे-भाजप युतीवरही भाष्य केलं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने मनसेशी युती केली तर सत्ता येणार नाही. आमच्याशी युती केली तर त्यांचा महापौर आणि आमचा उपमहापौर होऊ शकतो, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

एक प्रभाग तीन सदस्य पद्धत नकोच

दरम्यान, आठवले यांनी काही दिवसांपूर्वीच एक प्रभाग तीन सदस्य ही निवडणूक पद्धतीला विरोध केला होता. ही पद्धत लोकशाहीला हरताळ फासणारी असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक वॉर्ड एक सदस्य हीच निवडणूक पद्धत असावी असं त्यांनी सांगितलं. ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण असलेच पाहिजे त्याशिवाय निवडणुका होता कामा नयेत, राज्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 50 हजारांची मदत करावी, दलित अत्याचार रोखवेत, त्यासाठी अॅट्रोसिटी कायद्यातील तरतुदींची अंमलबाजवणी करावी, अत्याचार पीडित महिलांना 50 लाखांची आर्थिक सांत्वनपर मदत करावी यासह विविध मागण्यांसाठी रिपाइंने आंदोलनही केले होते.

संबंधित बातम्या:

VIDEO: छगन भुजबळ शिवसेनेत असते तर नक्कीच सर्वोच्च स्थानी गेले असते; संजय राऊतांचं मोठं विधान

संजय राऊतांचा आधी अमित शहांना खोचक सल्ला, आता राणे म्हणतात तुम्ही काश्मीरला जाऊन तरी दाखवा

अजितदादांनी जाहीर केलेल्या सर्वच साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करा; चंद्रकांत पाटलांनी ललकारले

(ramdas athawale reaction on nawab malik statement on sameer wankhede)

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.