Artificial intelligence ची कमाल, 25 वर्षांपूर्वी निधन झालेल्या गायकाच्या आवाजात नवे गाणे

| Updated on: Jan 26, 2021 | 3:56 PM

दक्षिण कोरियाई सुपरस्टार सिओक यांच्या हुबेहूब आवाजातील गाणं सादर केलं जाणार असल्याचा दावा केला जात आहे (South Korea Singer Voice using AI)

Artificial intelligence ची कमाल, 25 वर्षांपूर्वी निधन झालेल्या गायकाच्या आवाजात नवे गाणे
Follow us on

सेऊल : दक्षिण कोरियातील संगीतसृष्टीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial intelligence) तंत्रज्ञानाचा वापर करुन अशक्यप्राय वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात आणली आहे. 25 वर्षांपूर्वी निधन झालेल्या गायकाचा आवाज क्रिएट करत नवीन गाणे रिलीज केले जाणार आहे. मात्र या प्रयोगामुळे अनेक नैतिक प्रश्न उपस्थित होत आहेत. (South Korea to Bring Back Voice of Dead Superstar Kim Kwang-seok using AI)

सुपरस्टार सिओक यांचा आवाज पुन्हा ऐकण्याची संधी

किम क्वांग सिओक हे दक्षिण कोरियाच्या मनोरंजन विश्वातील सुपरस्टार होते. सिओक यांचं 1996 मध्ये निधन झालं. जगाचा निरोप घेऊन 25 वर्ष लोटल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या आवाजात चाहत्यांना नवीन गाणं ऐकायला मिळणार आहे. दक्षिण कोरियातील राष्ट्रीय वाहिनीवर सिओक यांचं हे गाणं प्रदर्शित होणार आहे.

सिओक यांचं नवं गाणं ऐकण्यास चाहते आतुर

सिओक यांनी गायलेली “अ लेटर फ्रॉम अ प्रायव्हेट” (A Letter From a Private), “साँग ऑफ माय लाईफ” (Song of My Life), “इन द वाईल्डरनेस” (In the Wilderness) यासारखी गाणी प्रसिद्ध आहेत. सिओक यांच्या निधनानंतर चाहत्यांना त्यांची गाणी ऐकण्याची हुरहूर लागली होती. मात्री ही संधी आता त्यांच्यासाठी चालून आली आहे.

‘शतकातील स्पर्धा : माणूस विरुद्ध आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ हा कार्यक्रम एसबीएस वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सिओक यांच्या हुबेहूब आवाजातील गाणं सादर केलं जाणार असल्याचा दावा केला जात आहे. (South Korea Singer Voice using AI)

दक्षिण कोरियात दुसरा प्रयोग

दक्षिण कोरियातील मयत गायकाच्या आवाजातील गाणं रिक्रिएट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्याच महिन्यात Mnet या म्युझिक चॅनलने शिन हाय चुल यांचं गाणं AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुनरुज्जीवित केलं होतं. शिन हाय चुल यांचं 2014 मध्ये निधन झालं आहे.

संबंधित बातम्या :

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने फेसबुक आक्षेपार्ह कंटेंटवर त्वरित कारवाई करणार

दररोज नव्हे तर आठवड्यातून 12 तासच काम, ‘अलिबाबा’च्या श्रीमंतीचा नवा फंडा

(South Korea to Bring Back Voice of Dead Superstar Kim Kwang-seok using AI)