आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने फेसबुक आक्षेपार्ह कंटेंटवर त्वरित कारवाई करणार

आक्षेपार्ह कंटेंटवर त्वरित कारवाई करण्यासाठी फेसबुक आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स-एआय तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने फेसबुक आक्षेपार्ह कंटेंटवर त्वरित कारवाई करणार

कॅलिफोर्निया : फेसबुक (Facebook) आता हानिकारक आणि आक्षेपार्ह कंटेंटवर (Harmful And Offensive content) त्वरित कारवाई करणार आहे. यासाठी कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स-एआय (Artificial Intelligence-AI) तंत्रज्ञानाची मदत घेत आहे. ज्या कंटेंटबाबत युजर्सच्या तक्रारी आहेत, त्या कंटेंटची प्राथमिकता ठरवण्यासाठी या AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. (Facebook using artificial intelligence to prioritise reported content)

जगभरात फेसबुकचे 1.82 अब्ज डेली (दररोज) अॅक्टिव्ह युजर्स आहेत. फेसुबकचे सर्वाधिक युजर असलेल्या देशांपैकी भारत एक आहे. यापूर्वी भारतात फेसबुकला द्वेष (Hate) पसरवणाऱ्या कंटेंटवरुन सरकारची बोलणी ऐकावी लागली होती. त्यामुळेच फेसबुक अधिक सजग होत असल्याचे बोलले जात आहे.

फेसबुकचे प्रोडक्ट्स मॅनेजर रेयान बार्नेस (Ryan Barnes) याबाबत म्हणाले की, फेसबुकवरील ज्या कंटेंटबाबत युजर्सच्या तक्रारी आहेत, त्या कंटेंटची प्राथमिकता ठरवण्यासाठी या AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. 15,000 हून अधिक समीक्षकांच्या मदतीसाठी अशा प्रकारे तक्रारी असलेल्या कंटेंटचे प्राधान्य ठरविणे फार महत्वाचे आहे.

दरम्यान रेयान यांनी यावळी एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली की, लोक प्रत्येक वेळी हानिकारक कंटेंटबाबत (Harmful content) तक्रारी करत नाहीत, तर काही वेळा ज्या तक्रारी केल्या जातात त्या खोट्या किंवा Harmful नसलेल्या कंटेंटबाबत असतात. त्यामुळे आम्हाला एआय तंत्रज्ञानाची मदत घेणे गरजेचे होते.

रेयान म्हणाले की, आमची कंपनी आता केवळ युजर्सच्या तक्रारींवर अवलंबून नाही. आता आम्ही पुढचा विचार करत आहोत. Harmful कंटेंटबाबत आता आम्ही अधिक मजबूत तंत्रज्ञानाची मदत घेत आहोत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांनी तक्रार करण्यापूर्वी जवळपास 95 टक्के Harmful कंटेंट आणि तो शेअर करणाऱ्या युजर्सना आम्ही पकडू शकतो.

संबंधित बातम्या

‘हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या भाजप नेत्यांच्या पोस्टवर कारवाई नाही’, WSJ च्या अहवालात Facebook वर गंभीर आरोप

Apple, Amazon, Facebook, Google च्या प्रमुखांवर गंभीर आरोप, अमेरिकेच्या संसदेत सर्वांची झाडाझडती

Facebook Avatars Feature | फेसबुकवर तुमचा अ‍ॅनिमेटेड अवतार कसा बनवाल?

(Facebook using artificial intelligence to prioritise reported content)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI