
मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी तिच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. अशातच ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

नुकतेच तिने तिचे नवीन लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने तिची नवीन हेअर स्टाईलचे शेअर केले आहेत.

तिच्या या फ्रेश आणि ग्लॅमरस लुकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये तिने निळ्या रंगाचा स्टायलिश ड्रेस परिधान केला आहे ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

स्पृहाच्या नवीन हेअरस्टाईलने तिच्या लुकमध्ये आणि सौंदर्यामध्ये एक वेगळीच चमक आली आहे. जी पाहून चाहते देखील तिचे कौतुक करत आहे.

यासोबतच तिने गळ्यात नाजूक दागिने आणि हातामध्ये गोल्डन वॉच घातली आहे. ज्यामुळे तिचा हा लूक एकदम परफेक्ट दिसत आहे.

नाकात नथ आणि तिचा हा लूक पाहून तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या या लुकची जोरदार चर्चा रंगली आहे.