
एका सोलो ट्रीप करणाऱ्या परदेशी तरुणीला एका बाईकस्वाराच्या लज्जास्पद वर्तनाला समोरे जावे लागले. सोशल मीडियावर हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामुळे एकट्याने पर्यटन करणे कसे धोकादायक आहे हे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारांमुळे देशाची बदनामी होत असते.
ही घटना जरी भारतातील नसली तर आपल्या शेजारील निसर्गसंपन्न श्रीलंकेतील आहे. श्रीलंकेत सोलो ट्रीपवर आलेल्या एका न्युझीलंडच्या तरुणीसोबत हा धक्कादायक विचित्र प्रकार घडला आहे. या घटनेने सोशल मीडियावर हंगामा झाला आहे. या व्हिडीओने सोलो ट्रीप करणाऱ्या तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
परदेशी लोक भारत किंवा श्रीलंका अशा देशात निसर्गाचे सौदर्य आणि येथील संस्कृतीचा अभ्यास करायला येत असतात. अशावेळी काही विचित्र प्रसंगामुळे संपूर्ण देशाची बदनामी होत असते. श्रीलंकेत सोलो ट्रीपवर आलेल्या न्युझीलंडच्या महिलेला असाच एक धक्कादायक अनुभव आला आहे.
न्युझीलंडची सोलो ट्रॅव्हलर मोल्स अलिकडे भाड्याची रिक्षा घेऊन श्रीलंकेत फिरत होती. त्यावेळी तिला एक त्रासदायक अनुभवाला सामोरे जावे लागले. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
सोलो ट्रॅव्हलर मोल्स हीने सांगितले की ती अरुगम खाडी आणि पासीकुडाच्या किनारी रस्त्यांच्याकडेला थोडावेळ थांबली होती. तेव्हा एक स्कूटर स्वार स्थानिक व्यक्ती तिच्याजवळ आला आणि तिच्या बोलण्याचा प्रयत्न करु लागला. सुरुवातीला मोल्स तो मनमिळावू वाटला. परंतू बोलताना त्याने त्याचा रंग दाखवला. त्यामुळे तिला अवघडल्या सारखे वाटले. त्याने तिला विचारले की कुठे जात आहेस ?
हा व्यक्ती मोल्सला त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवणार का ? अशी विचारणा करु लागला. एवढेच नाही मोल्सने काही प्रतिसाद दिला नाही तर त्याने थेट पँट काढून अश्लिल चाळे करुन दाखवू लागला. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की घाबरलेल्या मोल्स हीने लागलीच तिची रिक्षा सुरु केली आणि तेथून तिने काढता पाय घेतला. ही संपूर्ण घटना तिच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जो ड्रायव्हरच्या सीटवर लावलेला होता.
मोल्सने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या घटनेचा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की हा क्षण अशा क्षणांपैकी होता जो तुम्हाला आतू हादरवून टाकतो. ती पुढे म्हणते की एकट्याने प्रवास करणे थ्रीलींग आहे. परंतू दरवेळी आनंदी क्षण आणि चांगले अनुभव असतीलच असे नाही. काही घटना तुमच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणारे असतात आणि तुम्हाला सतर्क राहण्याची आठवण करुन देतात.
येथे पाहा व्हिडीओ –
तिने स्पष्ट सांगतले की या एका घटनेच्या आधारे संपूर्ण श्रीलंकेच्या लोकांबद्दल निष्कर्ष काढणे ठीक होणार नाही. कारण, ज्या स्थानिक लोकांना आपण भेटलो ते आतापर्यंत भेटलेले सर्वात दयाळू आणि उदार लोकांपैकी एक होते. मीडियाच्या वृत्तानुसार या पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.