हे आहेत जगातील 10 हटके जॉब, वाईन ते डॉग फूड टेस्ट करा रग्गड पगार मिळवा
जगात अजब प्रकारच्या जॉब संदर्भात तुम्ही माहिती ऐकली असेलच. परंतू या जॉबवर विश्वास बसणार नाही. काहींना झोपण्यासाठी पैसे मिळतात. काही ट्रेनमध्ये गर्दीला धक्का देण्याचे काम असते. तर काहींना मद्याची चव चाखण्याची रग्गड पैसा दिला जातो.

Weirdest Jobs: आपल्याला नोकरी म्हणजे ऑफीसला जाणे, लॅपटॉप चालवणे, ईमेल करणे असे वाटत असते. परंतू काही जॉब एकदम हटके असतात. यांना पॅकेजही तगडे असते. या जॉबचा प्रकार पाहून तुम्हाला असायला येईल आणि असा जॉब करणाऱ्याबद्दल असुया देखील वाटू शकते. खरेच असे जॉब असतात का असा मनात प्रश्न देखील निर्माण होईल. चला तर जगातील काही अजब जॉब बद्दलची माहिती घेऊयात. जेथे झोपून, वास घेऊन, रडून, बिअर पिऊन मोठ्या प्रमाणावर पैसा कमावता येतो.
1.झोपून पैसा कमवा
तुम्हाला जर रोज वेगवेगळ्या बेडवर झोपायला सांगितले आणि त्याचे पैसे मिळाले तर कसे वाटेल. फिनलँड येथील एका हॉटेलने एका कर्मचाऱ्याला केवळ याच कामासाठी ठेवले आहे. त्याला रोज नवा बेड, चांगली झोप आणि एक छोटा रिव्ह्यू द्यावा लागतो. अनेक गाद्या आणि बेड बनवणाऱ्या कंपन्या देखील असा जॉब ऑफर करतात. यासाठी मोठा तगडा पगार मिळतो.
2. रंग सुखताना पाहा आणि पैसे कमवा
युकेत एका माणसाला रंगवलेल्या कार्ड बोर्डना वाळताना पाहण्याचा जॉब आहे, रंग वाळायला किती वेळ लागतो, रंग कसा बदलतो. याच्या टेक्सचरमध्ये काय फरक येतो.ही जगातील सर्वात जास्त पेशन्स वा संयम असणारी नोकरी मानली जाते.
3. दिवसभर चित्रपट-सीरीज पाहा, पैसे मिळवा
हा जॉब नेटफ्लिक्सच्या व्युअरचा आहे. या व्यक्तीचा जॉब नविन सिरीज आणि फिल्मला रिलीज पूर्वी पाहाण्याचा आहे. योग्य कॅटगरी आणि टॅग लावणे आणि कंटेन्ट कशा प्रकारचा आहे. यासाठी चांगला पगार मिळतो.
4. ट्रेनमध्ये लोकांना ढकलण्याचा जॉब
जपानमध्ये ट्रेन एवढी गर्दी असते की लोकांना आत ढकलून दरवाजे बंद केल्या शिवाय ट्रेन सुटु शकत नाही. त्यामुळे लोकांना ट्रेनमध्ये ढकलून ट्रेनचे दरवाजे बंद होईल याची काळजी घ्यावी लागते. हा काम जोखमीचे असते.
5. रडण्याचे मिळतात पैसे
दक्षिण-पूर्व आशियातील देशात अंत्यसंस्काराला जोराने रडावे लागते. यासाठी खास व्यावसायिक रडणाऱ्या (Professional Mourners) बोलावले जाते. यात जोरात रडावे लागते. दुखवटा करुन कुटुंबाला साथ द्यावी लागते. हा कल्चर बेस्ड जॉब असून याला खूप मागणी आहे.
6. सांपाचे विष काढण्याचा जॉब
या जॉब करण्यासाठी आपण धाडसी असणे गरजेचे आहे. सापाचे विष काढून त्याचा औषधे आणि एंटी – व्हेनम लसी तयार करण्यासाठी वापर होतो. या खूपच रिस्की जॉब आहे.यासाठी खूप अनुभवाची गरज आहे. त्यामुळे या जॉबमध्ये तज्ज्ञ लोकच असतात.
7. डॉग फूड टेस्ट करण्याचा जॉब
डॉग फूड मार्केटमध्ये पाठवण्यासाठी माणसांद्वारे त्याची टेस्ट घेतली जाते. त्याची चव कशी आहे. टेक्सचर नीट आहे की नाही. क्वालिटी किती चांगली आहे. म्हणजे पाळीव कुत्र्यांआधी माणूस त्याची टेस्ट घेतो. या जॉबसाठी मोठा पगार दिला जातो.
8. वास घेण्याचा जॉब
अनेक प्रोडक्ट उदा. डिओ, साबण, स्कीन प्रोडक्ट्सची चाचणी करण्यासाठी प्रोफेशनल लोक ठेवले जातात. हे लोक लोकांचे श्वास, पाय आणि अंडरआर्मची दुर्गंधाचा वास घेतात. हे काम सोपे नाही. परंतू कंपन्यासाठी खूप गरजेचे असते. यासाठी चांगली सॅलरी दिली जाते.
9. एक सारखी टेस्ट रोज चाखणे
30 वर्षांपासून एक व्यक्ती रोज मार्मिटच्या वेग-वेगळ्या बॅचला टेस्ट करतो. त्याला टेक्सचर, फ्लेवर, कंसिस्टेन्सी सर्व चेक करायचे असते. यासाठी त्यांना चांगले पॅकेज असते
10. मद्य वा बिअर टेस्ट करण्याचा जॉब
वाईन इंडस्ट्री वेगाने वाढत आहे. साल 2025 पर्यंत ही 528 बिलियन डॉलरपर्यंत पोहचणार आहे. याचमुळे वाईन टेस्टर (Sommelier)एक हॉट करियर बनले आहे. वाईन टेस्टरला वाईनच्या प्रत्येक फ्लेवरला चाखणे, सुंगध, कलर, टेक्सचर तपासायचे असते.हे सर्व पाहून कंपनीला रिपोर्ट द्यावा लागतो. हा जबाबदारीचा प्रोफेशन आहे.याचे कोर्स देखील असतात. आणि भारतात 50,000 रुपयांपासून ते 3 लाखांहून अधिक पगार यासाठी द्यावा मिळतो.
