Video : आज माझ्या 120 भगिनी विधवा झाल्या, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी महिलेचा आक्रोश

एसटी कर्मचाऱ्यांनी (St Worker Strike) आज शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर जोरदार आंदोलन केले आहे. यावेळी एसटी कर्मचारी हातात दगड घेऊन आणि चपला घेऊन दिसून आले. यावेळी शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना चोरांचे सम्राट म्हणत एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शरद पवार आमच्या विलीनीकरणाच्या आड आले. अशा प्रतिक्रिया एसटी कर्मचारी देत होते मात्र मध्येच […]

Video : आज माझ्या 120 भगिनी विधवा झाल्या, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी महिलेचा आक्रोश
Image Credit source: TV9
आयेशा सय्यद

|

Apr 08, 2022 | 4:42 PM

एसटी कर्मचाऱ्यांनी (St Worker Strike) आज शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर जोरदार आंदोलन केले आहे. यावेळी एसटी कर्मचारी हातात दगड घेऊन आणि चपला घेऊन दिसून आले. यावेळी शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना चोरांचे सम्राट म्हणत एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शरद पवार आमच्या विलीनीकरणाच्या आड आले. अशा प्रतिक्रिया एसटी कर्मचारी देत होते मात्र मध्येच एक महिला येते आणि प्रतिक्रिया देते की  कुणाकुणाला अडवणार आहेत. आमचं वैर आहे सत्ताधाऱ्यांशी. आम्ही आज विधवा झालो आहोत. 120 जणांच्या नावानं मी चुडा फोडल्यात आज अजित पवार, शरद पवारांच्या दारात! आज माझा आक्रोश आहे त्यांच्याबद्दल. आज माझ्या 120 भगिनी विधवा झाल्या. त्यांच्या घरी काय अवस्था आहे ओ… त्यांची लेकरं रडायला लागलीये… असा आक्रोश या महिलेचा यावेळी दिसून आला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें