AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्राहक-विक्रेत्यांचं अजब गणित, दोन मित्रांना नारळवाल्याचं भन्नाट उत्तर; पाहा Funny Viral Video

Funny Video : सोशल मीडियावर (Social Media) रोज हजारो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होतोय. हा व्हिडिओ दोन मित्र आणि नारळविक्रेता (Coconut seller) यांच्यामधला आहे. हा व्हिडिओ आपल्याला हसवल्याशिवाय राहत नाही.

ग्राहक-विक्रेत्यांचं अजब गणित, दोन मित्रांना नारळवाल्याचं भन्नाट उत्तर; पाहा Funny Viral Video
नारळविक्रेत्याकडून नारळ खरेदी करताना दोन मित्र
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Feb 16, 2022 | 7:30 AM
Share

Funny Video : सोशल मीडियावर (Social Media) रोज हजारो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेक व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. तर काही व्हिडिओ डोळ्यांतून पाणी आणतात. म्हणजेच भावुक करतात. यूझर्स सर्वच व्हिडिओजना पसंती देतात. मात्र सर्वात जास्त आवडीचा भाग म्हणजे विनोदी व्हिडिओ. एकापेक्षा एक असे विनोदी (Funny) व्हिडिओ व्हायरल होताना आपण रोज पाहत असतो. कधी सिनेमाचे डायलॉग्स, कधी गाण्यांवर मजेदार डान्स, दोन मित्रांमधला मजेशीर संवाद एक ना अनेक असे विषय… ज्यावर विनोदी व्हिडिओ तयार होत असतात. आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होतोय. हा व्हिडिओ दोन मित्र आणि नारळविक्रेता (Coconut seller) यांच्यामधला आहे. हा व्हिडिओ आपल्याला हसवल्याशिवाय राहत नाही. तुम्हीही या तिघांमधला संवाद पाहा, हसू येईल.

100ला तीन नारळ

दोन मित्र आणि एक नारळवाला आपल्याला सुरुवातीला दिसेल. मग पहिला मित्र दुसऱ्याला म्हणतो, की मी तुला पागल नारळवाला दाखवतो. मी त्याच्याकडून रोज नारळ घेतो. तो एक नारळ 30 रुपयांना आणि तीन नारळ 100 रुपयांना देतो. मी त्याच्याकडून तीन नारळ तीस-तीस रुपयांना घेतो. ते मला 90 रुपयांना पडतात. चल तुला दाखवतो, म्हणून मित्राला त्या नारळविक्रेत्याकडे घेऊन जातो. त्याच्याकडून नारळही घेतो. तीस-तीस प्रमाणे त्याला तीन नारळांचे 90 रुपये देतो.

यूट्यूबवर अपलोड

दोन मित्रांमधला दुसरा पुन्हा नारळविक्रेत्याकडे जातो आणि याबद्दल विचारतो, त्यावेळी नारळवाला भन्नाट उत्तर देतो. तो काय म्हणतो, हे व्हिडिओ पाहुन लक्षात येईलच. मात्र तुम्हालाही हसू येईल. हा व्हिडिओ यूट्यूबवर सॅम शर्मा टीबीसी (Sam Sharma TBC) या चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. 30 जानेवारीला अपलोड या व्हिडिओला 23 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘Pagal nariyal wala‘ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. यूझर्सना हा व्हिडिओ आवडलाय. ते लाइक आणि कमेंट्स करत आहेत. (Video courtesy – Sam Sharma TBC)

आणखी वाचा : 

शेळीचा smoke करतानाचा Video Viral; लोक म्हणतायत, आधीच्या जन्मी नक्की व्यसनी व्यक्ती असावी!

Dosa आणि Kurkureचं खतरनाक Combination; यूझर्सच्या रागाचा वाढला पारा, म्हणतायत…

…म्हणून एकावेळी एकच काम करावं, नाहीतर ‘या’ मुलीसारखं हसं होतं; Treadmill video viral

Follow Us
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?